Salman Khan B'day: 'भाईजान' सलमान खानला महागड्या कारचा शौक, कलेक्शन पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:39 IST2024-12-27T16:39:21+5:302024-12-27T16:39:30+5:30

सलमान खान हा कार प्रेमी आहे. त्याच्याजवळ कोटींच्या घरात कार आहेत.

Salman Khan Birthday Know About Car Collection Many Cars Are Parked In The Garage | Salman Khan B'day: 'भाईजान' सलमान खानला महागड्या कारचा शौक, कलेक्शन पाहून व्हाल थक्क

Salman Khan B'day: 'भाईजान' सलमान खानला महागड्या कारचा शौक, कलेक्शन पाहून व्हाल थक्क

Salman Khan Birthday : आज बॉलिवूड स्टार सलमान खानचा वाढदिवस आहे. २७ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेला सलमान आता ५९ व्या वर्षात पदार्पण करतोय. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचला. त्याने खूप नाव कमावले हे सर्वांनाच माहितीय. नावासोबतच सलमानने भरपूर पैसाही कमावला आहे. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या सलमानकडे महागड्या गाड्यांचं (Salman Khan Car Collection) कलेक्शन आहे. 

सलमान खान हा कार प्रेमी आहे. त्याच्याजवळ कोटींच्या घरात शानदार कार आहेत. तब्बल २.३२ कोटी रुपयांची लेक्सस एलएक्स ४७० त्याच्या ताफ्यात आहे. यात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. तर २ कोटींची बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्हीदेखील आहे. सलमानच्या जीवाला असलेला धोका पाहता ही गाडी खरेदी करण्यात आली होती. 

याशिवाय सलमानकडे १.२९ कोटींची लँड क्रूजर देखील आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्वात महागड्या कारपैकी ही एक आहे.  तसेच अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेली १.१५ कोटींची बीएमडब्ल्यूएक्स ६ त्याच्याकडे आहे. सर्वोत्तम मानली जाणारी १.४ कोटींची ऑडी आरएस ७ सलमानकडे आहे. यासोबतच २.०६ कोटींची रेंज रोव्हर,  २.३१ कोटींची ऑडी आर ८ आणि  ८२ लाखांची मर्सिडीज बेंझ या गाड्या त्याच्या कार कलेक्शनमध्ये आहेत. 

सलमान खानने १९८८ साली 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु, १९८९ मध्ये आलेल्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटाने त्याला एक मोठा सुपरस्टार बनवलं.  त्यानंतर 'हम आपके हैं कौन,' 'करण अर्जुन,' 'हम दिल दे चुके सनम,' 'तेरे नाम,' 'वॉन्टेड,' 'दबंग,' 'बजरंगी भाईजान,' आणि 'एक था टायगर' असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. आता लवकरच तो सिंकदर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Salman Khan Birthday Know About Car Collection Many Cars Are Parked In The Garage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.