पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- "४ आणि ५ मे रोजी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 13:43 IST2025-04-28T13:42:54+5:302025-04-28T13:43:37+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यानंतर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या या निर्णयाविषयी सर्वांना सांगितलं आहे. काय म्हणाला सलमान खान? जाणून घ्या (salman khan)

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- "४ आणि ५ मे रोजी..."
पहलगाम हल्ल्यामुळे (pahalgam attack) संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. जगभरातील सेलिब्रिटींपासून नागरीकांनी या हल्लाचा तीव्र शब्दात निषेध केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागला. या भ्याड हल्ल्याविरोधात सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. या हल्ल्याबद्दल बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (salman khan) x वर पोस्ट लिहून त्याचा राग व्यक्त केला होता. अशातच आता पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. याविषयी भाईजानने सोशल मीडियावर जाहीर केलंय.
सलमानने पहलगाम हल्ल्यानंतर घेतला मोठा निर्णय
सलमानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर त्याच्या आगामी युके टूर संदर्भात एक पोस्ट शेअर केली. सलमानने लिहिलंय की, "काश्मीरमध्ये नुकतीच जी दुःखद घटना घडली ती डोळ्यासमोर ठेऊन आम्ही जड अंतःकरणाने सांगू इच्छितो की, ४ आणि ५ मेला मॅनचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा ‘द बॉलीवुड बिग वन शो यूके’ हा कार्यक्रम तूर्तास स्थगित केलाय. आमचे चाहते या शोची खूप वाट पाहत होते. परंतु सध्याच्या कठीण काळात हा शो पुढे ढकलणं हाच आमच्यासाठी उत्तम निर्णय आहे."
सलमान याच पोस्टमध्ये शेवटी लिहितो की, "तुम्हाला आमच्या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारची असुविधा निर्माण झाली असेल तर आम्ही मनापासून तुमची माफी मागतो. तुमचा पाठिंबा आणि समजुतदारपणा याची आम्हाला गरज आहे. या शोच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच केली जाईल", अशा शब्दात सलमानने पोस्ट लिहून त्याचा निर्णय जाहीर केलाय. देश दुःखात असताना सलमानने हा बिग बजेट शो स्थगित करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचं अनेकांनी कौतुक केलंय. सलमानची भूमिका असलेला 'सिकंदर' सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. सलमानच्या आगामी प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती नाही.