जेव्हा सलमान स्टेजवर आला...; नुपूर सनॉनच्या रिसेप्शन पार्टीत कुटुंबाकडून भाईजानचं खास स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:09 IST2026-01-14T14:08:50+5:302026-01-14T14:09:47+5:30
सलमान खानने रिसेप्शनमध्ये प्रवेश करताच संपूर्ण माहोल बदलून गेला.

जेव्हा सलमान स्टेजवर आला...; नुपूर सनॉनच्या रिसेप्शन पार्टीत कुटुंबाकडून भाईजानचं खास स्वागत
बॉलीवूड अभिनेत्री कृती सनॉनची बहीण नुपूर सनॉन आणि गायक स्टेबिन बेन काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले. उदयपूरमध्ये त्यांचा विवाहसोहळा थाटात पार पडला. तर काल रात्री मुंबईत त्यांच्या भव्य रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. चित्रपटसृष्टीतील आपल्या मित्रपरिवारासाठी हा खास सोहळा आयोजित केला. या पार्टीत दिशा पाटनी, मौनी रॉय, फराह खान आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान सुपरस्टार सलमान खान आला तेव्हा त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या.
नुपूर सनॉन आणि स्टेबिन बेनच्या रिसेप्शनमध्ये सलमान खानही आला होता. सलमान खानने रिसेप्शनमध्ये प्रवेश करताच संपूर्ण माहोल बदलून गेला. त्याला पाहताच नुपूरचा पती स्टेबिन बेन स्वतः धावत त्याच्याकडे गेला आणि त्याने अत्यंत आदराने सलमानचं स्वागत केलं. यावेळी स्टेबिन खूपच उत्साहित दिसत होता. तो पाया पडणार तेवढ्यात सलमानने त्याला अडवलं आणि गळाभेट घेतली. नंतर सलमानने नुपूरचा हात धरून तिला स्टेजवर आणले आणि नवविवाहित जोडप्यासोबत फोटो काढले. सेनॉन कुटुंबाने ज्या उत्साहात सलमानचे स्वागत केले, ते पाहून सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आदरातिथ्याचे आणि संस्कारांचे कौतुक करत आहेत.
या दिमाखदार सोहळ्यात टीव्ही आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. रकुल प्रीत सिंह,जॅकी भगनानी, नेहा धुपिया, फराह खान, नील नितीन मुकेश, हिना खान, अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांसारख्या कलाकारांनी रिसेप्शनमध्ये हजेरी लावली. सलमानच्या येण्याने नुपूरच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या पार्टीचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांच्या मते सलमान खानच्या उपस्थितीने या लग्नाला चार चाँद लागले आहेत.