चाहत्यावर का भडकला सलमान खान ? व्हायरल झाला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 16:33 IST2024-03-08T16:32:08+5:302024-03-08T16:33:47+5:30

सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान खान

Salman Khan Angry With A Fan Who Tried To Click Selfie Video Viral | चाहत्यावर का भडकला सलमान खान ? व्हायरल झाला व्हिडीओ

चाहत्यावर का भडकला सलमान खान ? व्हायरल झाला व्हिडीओ

फिल्मस्टार्स कुठंही दिसले की, त्यांच्या भोवती चाहत्यांची गर्दी होतेच. सेल्फीसाठी चाहते हट्ट धरतात. हे चित्र काही नवीन नाही. अनेक सेलिब्रिटी सेल्फीसाठी हसत हसत पोज देतात, तर काही सेलिब्रिटी हसत नकारही देतात. तर अनेकदा कलाकार सेल्फी देण्याच्या मनिस्थितीत नसतात. त्यांच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू असतात.  त्यामुळं ते चाहत्यांना नकार देतात. असंच काहीसं अभिनेता सलमान खानसोबत झालं आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. 

सलमान खानची फॅन फॉलोइंग आणि स्टारडम जबरदस्त आहे. चाहतेदेखील त्याच्यासाठी खूप वेडे आहेत आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा सेल्फी घेण्याची किंवा त्याच्या सोबत फोटो काढण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.  अशातच एका सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्याच्या एका कृतीमुळे सलमान थोडासा चिडलेला व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसते की, सलमान खान चालताना दिसून येत आहे. तर एक चाहता हा त्याचा व्हिडीओ घेताना दिसून येत आहे. चाहत्याला व्हिडीओ काढताना पाहून सलमान त्याच्यावर भडकतो. त्याला व्हिडीओ बंद करायला सांगतो, असं व्हिडीओमध्ये दिसून येतं. 

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याचा 'पठाण'मधील कॅमिओही तुफान गाजलेला.  तो लवकरच विष्णुवर्धनच्या 'द बुल'मध्ये दिसणार आहे. दरम्यान आजपर्यंत भाईजान सलमान अविवाहित आहे. मात्र सलमान खान लग्न का करत नाही आणि तो कधी लग्न करणार, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
 

Web Title: Salman Khan Angry With A Fan Who Tried To Click Selfie Video Viral