सौदी अरेबियन चित्रपटात दिसली सलमान खान आणि संजय दत्तची झलक, '७ डॉग्स'चा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:07 IST2025-06-06T17:04:49+5:302025-06-06T17:07:44+5:30
'७ डॉग्स' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

सौदी अरेबियन चित्रपटात दिसली सलमान खान आणि संजय दत्तची झलक, '७ डॉग्स'चा टीझर प्रदर्शित
7 Dogs Teaser: बॉलिवडूचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या जोडीने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघांमध्ये घट्ट मैत्रीदेखील आहे. हे दोघे 'गंगा राम' (Ganga Ram) नावाच्या चित्रपटात एकत्र दिसणार अशी चर्चा होती. ही जोडी एका चित्रपटात दिसली आहे. पण, हा चित्रपट हॉलिवूड किंवा बॉलिवूडचा नाही तर सौदी अरेबिनयन आहे. '७ डॉग्स' चित्रपटामध्ये दोघांची झलक पाहायला मिळाली आहे.
हॉलिवूडच्या 'बॅड बॉईज फॉर लाईफ' आणि 'मिस मार्वल' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह दिग्दर्शित '७ डॉग्स' या नवीन चित्रपटाचा टीझर आला आहे. जरी हा सौदी अरेबियाचा चित्रपट असून टीझरची भाषादेखली कळत नाहीये. पण, टीझरमध्ये संजय दत्त आणि सलमान खानची झलक पाहून त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. टीझरमध्ये सलमान खान पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसत आहे, तर संजय दत्त हातात रिव्हॉल्व्हर धरून आहे.
'७ डॉग्स'मध्ये सलमान खान आणि संजय दत्त यांचा कॅमिओ आहे. मात्र, चित्रपटात दोघांच्याही भूमिकेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह या दिग्दर्शक जोडीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. दरम्यान,काही महिन्यांपूर्वी सेटवरील फोटो लीक झाले होते.
Salman Khan 🔥 Sanjay Dutt 🧨
— CINEMA2LOVE (@Love2CINEMA) June 6, 2025
Together in The Seven Dogs – a Hollywood thriller with global power! 🌍🎬#SalmanKhan#SanjayDutt#TheSevenDogs#GlobalCinemapic.twitter.com/iteJQa5SiY
'७ डॉग्स'चं बजेट
या चित्रपटाचे बजेट ४० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे ३४३ कोटी रुपयांचं असल्याचं सांगितलं जातं आहे. या चित्रपटात अरब चित्रपटसृष्टीचे पॉवरहाऊस मानले जाणारे करीम अब्देल अझीझ आणि अहमद एझ मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांनाही यापूर्वी 'किरा अँड एल जिन' या चित्रपटात एकत्र पाहिले होते. त्या चित्रपटानं इजिप्तमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम केला होता. '७ डॉग्स' हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.