'सैयारा' फेम अहान पांडेने अभिनेता होण्यापूर्वी 'या' क्षेत्रात अजमावलंय नशीब, करिअरविषयी पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:15 IST2026-01-30T13:11:49+5:302026-01-30T13:15:41+5:30

संघर्ष कुणालाच चुकला नाही! अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अहान पांडे करायचा 'हे'काम, जुन्या दिवसांबद्दल सांगताना म्हणाला...

saiyaara movie fame ahaan panday talk about her journey explore serval career path says | 'सैयारा' फेम अहान पांडेने अभिनेता होण्यापूर्वी 'या' क्षेत्रात अजमावलंय नशीब, करिअरविषयी पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला...

'सैयारा' फेम अहान पांडेने अभिनेता होण्यापूर्वी 'या' क्षेत्रात अजमावलंय नशीब, करिअरविषयी पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला...

Ahan Pandey: मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटात अहान पांडेया नवख्या कलाकारांने मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. जेन-झीची  लव्हस्टोरी सांगणारा हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला. अहान त्याच्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून  स्टार झाला. या चित्रपटातील त्याचं कामाची सगळ्यांनी स्तुती केली, शिवाय  चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई देखील केली. परंतु, तुम्हाला अभिनेता होण्यापूर्वी अहानने स्वतःसाठी एक नाही तर अनेक करिअर मार्ग निवडले होते, एका मुलाखतीत त्याने स्वत:याबाबत खुलासा केला आहे. तसेच त्याच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे.

अलिकडेच  'Grazia' ला दिलेल्या मुलाखतीत अहान पांडेने त्याच्या करिअरविषयी खुलासा केला आहे. तो म्हणाला," सोळा वर्षांचा असताना डीजेच्या प्रोफेशनसाठी प्रयत्न केला. त्यानंतर एका प्रोडक्शनमध्ये काम केलं. माझा 'बेस ट्रॅप' नावाचा एक ग्रुप होता.आम्ही काही गाण्यांचे ट्रॅक सुद्धा रिलीज केले. मग मी व्हिडिओ गेमिंगच्या क्षेत्रात आलो."

अशी झाली फिल्मी दुनियेत एन्ट्री...

अहान पांडे त्याच्या या प्रवासाबद्दल म्हणाला,"अखेरीस मी एका चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली.कारण, कुठेतरी माझ्यामध्ये अभिनेता होण्याची आवड निर्माण झाली होती. मी त्या चित्रपटाच्या सेटवर सगळ्या गोष्टींच शांतपणे निरिक्षण करायचो.त्यानंतर मी माझ्या पहिल्या चित्रपटाचे ऑडिशन दिलं. तेव्हा मला जाणवलं की योग्य लोकांसमोर सादरीकरण करणं म्हणजे काय असतं.तेव्हाच मी ठरवलं की कोणत्या तरी एका गोष्टीकडे करिअर म्हणून लक्ष केंद्रित करायचं. इतक्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला अभिनय क्षेत्र आपल्यासाठी योग्य असल्याची जाणीव झाली."असा खुलासा अभिनेत्याने मुलाखतीत केला. 

अहान पांडेने हिंदी सिनेसृष्टीत ‘सैयारा’च्या माध्यमातून ऐतिहासिक पदार्पण केले आहे, ज्याबद्दल कितीही चर्चा केली तरी कमीच आहे. ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर ३३७ कोटींहून अधिक व्यवसाय केला होता आणि जगभरातील त्याचे कलेक्शन ५७९ कोटींहून अधिक होते. 

Web Title : 'सैयारा' फेम अहान पांडे का अभिनय से पहले का करियर पथ खुलासा।

Web Summary : 'सैयारा' की प्रसिद्धि से पहले, अहान पांडे ने डीजेइंग, प्रोडक्शन और वीडियो गेमिंग का पता लगाया। उन्होंने फिल्म सेट पर सहायता की, जिससे उनके अभिनय का जुनून बढ़ा और उनकी सफल शुरुआत हुई।

Web Title : 'Saiyaara' fame Ahaan Pandey's pre-acting career path revealed.

Web Summary : Before 'Saiyaara' fame, Ahaan Pandey explored DJing, production, and video gaming. He assisted on film sets, fueling his acting passion and leading to his successful debut.