सायनाला वाटतंय, श्रद्धाने आपली भूमिका गांभीर्याने साकारावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 18:28 IST2018-08-01T18:25:05+5:302018-08-01T18:28:07+5:30
सायना नेहवालच्या बायोपिकसाठी श्रद्धा खूप मेहनत करते आहे.

सायनाला वाटतंय, श्रद्धाने आपली भूमिका गांभीर्याने साकारावी
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ता करत आहेत. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे शेड्युल अद्याप ठरले नाही. सायनाची भूमिका बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर करणार आहे. या भूमिकेसाठी श्रद्धा खूप मेहनत घेते आहे. ती नियमित बॅडमिंटनचा सराव करते आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी ती जी-तोड मेहनत करते आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाने आपली भूमिका अतिशय गांभीर्याने साकारावी अशी सायनाची इच्छा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्यापूर्वी श्रद्धाने तिला संपूर्ण समजून घ्यावे असे सायनाला वाटत आहे. काही दिवासांपर्यंत श्रद्धाला या खेळाबद्दलही काही माहीतदेखील नव्हते. मात्र पद्मभूषण पुरस्कार विजेती सायना आणि श्रद्धा आता एकमेकींच्या संपर्कात आहेत. टीमला लागणारी सर्व मदत सायना करते आहे. दरम्यान श्रद्धा आपली भूमिका साकारण्यास योग्य तऱ्हेने तयार होईल तेव्हा सायना चित्रीकरणाला परवानगी देईल, अशीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर श्रद्धाची मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
श्रद्धाचा आपले काम चोख बजावण्याकडे कल असतो. त्यामुळे ती कोणत्याही कामाकडे गांभीर्याने पाहते. गेले २२ दिवस ती सतत चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळे तिला बॅडमिंटनच्या सरावासाठी वेळ मिळत नसल्याची माहिती मिळते आहे. नुकतेच एका चित्रपटाच्या लाँचिंग दरम्यान श्रद्धाला बायोपिक संदर्भात प्रश्न केले असता तिने काहीही बोलण्यास नकार दिला होता.
श्रद्धाला सायनाच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.