'ती माझा जीव घेईल'; करीनाच्या परवानगीशिवाय सैफने 'ही' गोष्ट केली तर त्याची खैर नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 14:01 IST2023-08-11T13:58:41+5:302023-08-11T14:01:48+5:30
Saif ali khan: सैफने करीनाच्या स्वभावाविषयी भाष्य केलं आहे.

'ती माझा जीव घेईल'; करीनाच्या परवानगीशिवाय सैफने 'ही' गोष्ट केली तर त्याची खैर नाही
बॉलिवूडमधील कपल गोल म्हणून अभिनेता सैफ अली खान ( saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor khan) या जोडीकडे पाहिलं जातं. शाहिद कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर करीनाने सैफला डेट करण्यास सुरुवात केली.बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करीना आणि सैफ या जोडीने २०१२ मध्ये लग्न केलं. विशेष म्हणजे आजदेखील या जोडीतलं प्रेम कायम असून त्यांच्यातील हे गोड नातं बऱ्याचदा दिसून येतं. अनेकदा सैफ आणि करीना उघडपणे त्यांच्या नात्यावर भाष्य करत असतात. यात अलिकडेच सैफने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने करिनाविषयी काही गोष्टी सांगितल्या. इतकंच नाही तर तिच्या स्वभावाविषयी बोलत असताना 'ती माझा जीव घेईल', असंही सैफ मजेमध्ये म्हणाला.
अलिकडेच सैफने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला करीनाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. "लॉकडाउनच्या काळात तू कधी करीनाचा हेअर कट केला आहेस का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सैफने मजेशीर उत्तर दिलं. "मी कधीच तसं काही केलं नाही. आणि, जर मी तसं काही केलं तर नक्कीच ती माझा जीव घेईल. मी तिचा हेअरकट करायचा विचारसुद्धा करु शकत नाही", असं सैफ म्हणाला.
दरम्यान, टशन सिनेमामध्ये सैफ आणि करीना या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या सेटवरच करीना,सैफच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी लग्नगाठ बांधली. या जोडीला तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.