Saif Ali Khan Attack: रुग्णालयात सैफला भेटायला सगळे आले, मात्र 'ती' एक व्यक्ती आली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 15:11 IST2025-01-17T15:11:11+5:302025-01-17T15:11:58+5:30
सध्या सैफ हा कठीण काळातून जात आहे. त्याची भेट घेण्यासाठी सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालय गाठलं. पण, या सर्वात एक व्यक्ती कुठेच दिसली नाही.

Saif Ali Khan Attack: रुग्णालयात सैफला भेटायला सगळे आले, मात्र 'ती' एक व्यक्ती आली नाही
Saif Ali Khan Knife Attack: बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे एका चोराने चाकूने हल्ला केला होता. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकू अडकल्यामुळे त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवावरचा धोका टळला आहे. त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
सध्या सैफ हा कठीण काळातून जात आहे. त्याची भेट घेत विचारपूस करण्यासाठी सेलिब्रिटींनी लिलावती रुग्णालय गाठलं. करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट, मलायक अरोरा यांनी सैफची भेट घेतली. त्यासोबतच सैफची बहीण सोहा अली खान आणि सबा अली खान तर आई शर्मिला टागोर यांनी लीलावती हॉस्पिटल गाठलं. त्या पाठोपाठ सैफची मुलं इब्राहिम अली खान आणि सारा अली खान यांनीदेखील वडिलांच्या काळजीपोटी हॉस्पिटलच्या वाऱ्या केल्या आहेत. पण, या सर्वात एक व्यक्ती कुठेच दिसली नाही.
ती व्यक्ती आहे सैफची पहिली पत्नी आणि इब्राहिम अली खान आणि सारा अली खानची आई अमृता सिंग (Amrita Singh). सैफच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सर्व आले. मात्र, अद्याप अमृता सिंग दिसल्या नाहीत. कदाचित अमृता सिंग सैफला पाठिंबा देण्यासाठी पोहचली, तर ते दोघे १३ वर्षांनी एकमेकांसमोर येतील. वृत्तानुसार, करीना कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी सैफ अली खानचं अमृता सिंगशी एका पत्राद्वारे बोलणं झालं होतं.
दरम्यान, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न १९९१ मध्ये झालं होतं आणि दोघेही २००४ मध्ये वेगळे झाले. यानंतर, सैफ अली खानने २०१२ मध्ये करीना कपूरशी लग्न केले. सैफ अली खान आणि अमृता सिंग वेगळे झाले असले तरी मुलांचा दोघेही सांभाळ करतात. इब्राहिम अली खान आणि सारा अली खान यांचे करीना कपूरसोबतही खूप जवळचे नाते आहे. ते अनेकदा सण आणि उत्सवांमध्ये एकत्र दिसतात.