१३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:01 IST2025-01-17T18:01:39+5:302025-01-17T18:01:50+5:30

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अनेक नवीन अपडेट्स समोर येत आहेत

Saif Ali Khan Knife Attack Highlights Absence Of Cctv Cameras Mumbai Police Investigate Bandra High-profile Satguru Sharan Building | १३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती

१३०० कोटींचा मालक सैफ राहतो खासगी सुरक्षेविनाच, घरी CCTV नाही, मुंबई पोलिसांची माहिती

Saif Ali Khan Stabbing Incident: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर  गुरुवारी पहाटे हल्लेखोराने घरात शिरून चाकूने हल्ला (Saif Ali Khan Stabbed )केला. हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. त्यापैकी तीन वार हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते. सैफवर लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी तप्तरतेने शस्त्रक्रिया केल्या. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. पण, एखाद्या दिग्गज सेलिब्रिटीच्या थेट घरात घुसून त्याच्यावर हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केल्यामुळे केवळ इंडस्ट्री नव्हे, तर देशभरात खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे.

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अनेक नवीन अपडेट्स (Saif Ali Khan Knife Attack Highlights) समोर येत आहेत. पोलिस तपासात असे दिसून आलं आहे की सैफ राहत असलेल्या ठिकाणी कोणताही पाळत ठेवणारा कॅमेरा नव्हता. एवढ्या मोठ्या स्टारच्या घरी CCTV कॅमेऱा नसल्यानं पोलिसांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, "सैफ त्याची पत्नी करीना कपूर खान आणि मुलांसह ज्या क्वाड्राप्लेक्स (चार मजले) राहतो, त्या क्वाड्रिप्लेक्सच्या आत किंवा बाहेर कोणतेही पाळत ठेवणारे कॅमेरे नव्हते". 

याबद्दल बोलताना, पोलिस अधिकारी म्हणाले, "प्रवेशद्वारावर किंवा फ्लॅटच्या आत येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीची तक्रार करण्यासाठी कोणताही वैयक्तिक रक्षक नव्हता. बिल्डिंग सोसायटीकडे येणाऱ्या लोकांची माहिती ठेवण्यासाठी रजिस्टरही नव्हते. खरोखरच आश्चर्य वाटतं की हाय-प्रोफाइल जोडप्यानं सुरक्षेचे कोणतेही उपाय केले नव्हते".

तब्बल १3०० कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला सैफ अली खान वांद्रे भागातील 'सद्‌गुरू शरण' (Satguru Sharan) अपार्टमेंटमध्ये राहतो. जे त्यांनं २०१३ मध्ये सतगुरु बिल्डर्सकडून ४८ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.  सैफचे घर चार मजल्यांमध्ये पसरलेले आहे. प्रत्येक मजल्यावर ३ बीएचके फ्लॅट आहेत आणि एकूण क्षेत्रफळ सुमारे ३,००० चौरस फूट आहे. त्यांच्याकडे एक खास टेरेस आणि एक स्विमिंग पूल देखील आहे. सैफ ज्या परिसरात राहतो, तिथे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची घरे आहेत. सैफवरील हल्ल्यानंतर त्यांच्यामध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Web Title: Saif Ali Khan Knife Attack Highlights Absence Of Cctv Cameras Mumbai Police Investigate Bandra High-profile Satguru Sharan Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.