सैफ दिसला फिट अँड फाईन! चाहत्यांच्या दिशेने हात उंचावत दिली स्माईल; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:32 IST2025-01-21T17:32:08+5:302025-01-21T17:32:39+5:30

सैफ अली खानने मानले सर्वांचे आभार

saif ali khan got discharged from hospital after 6 days of attack now looks fit and fine | सैफ दिसला फिट अँड फाईन! चाहत्यांच्या दिशेने हात उंचावत दिली स्माईल; Video व्हायरल

सैफ दिसला फिट अँड फाईन! चाहत्यांच्या दिशेने हात उंचावत दिली स्माईल; Video व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सहा दिवसांनंतर तो पुन्हा घरी परतला आहे. १६ जानेवारी रोजी सैफवर त्याच्याच घरात चोराने हल्ला केला. रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने त्याच्यावर चाकून ६ वार केले. यानंतर सैफला रक्तबंबाळ अवस्थेत लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरीकडे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. कालच त्याला अटक झाली आहे. तर दुसरीकडे आज सैफ घरी परत आला आहे. त्याची पहिली झलक समोर आली आहे.

सैफ अली खानचे अनेक चाहते आहेत. त्याच्या प्रकृतीसाठी सगळेच प्रार्थना करत होते. लीलावती रुग्णालयात डॉक्टरांनी सैफवर सर्जरी केली. त्याच्या पाठीतून २ इंचाचा चाकूचा तुकडा काढला. पाच दिवसांनी आज त्याला घरी सोडण्यात आलं. सैफच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात दिसले. पांढरा शर्ट, निळी जीन्स, डोळ्यावर गॉगल अशा नॉर्मल लूकमध्ये तो कारमधून उतरुन बाहेर आला. आधी तो घरी गेला तेव्हा त्याची काही सेकंदाची झलक दिसली. मात्र काही वेळाने तो पुन्हा घराखाली आला आणि चाहत्यांना हात दाखवत अभिवादन केलं. त्यांचे आभार मानले. यावेळी सैफ अगदी फिट दिसत होता.  त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सैफ अली खान बांद्रा येथील सतगुरु शरण या उच्चभ्रू इमारतीत राहतो. येथील सुरक्षायंत्रणा कमकुवत असल्याने चोराने याचा फायदा उचलला आणि तो थेट १२ व्या मजल्यावर सैफच्या घरी पोहोचला होता. एसी डक्टमधून जात तो तैमुर आणी जेहच्या बेडरुममध्ये आला होता. यानंतर पुढची सर्व  घटना घडली. आता सैफच्या बाल्कनी, एसी डक्टजवळ जाळ्या लावण्यात आल्या आहेत. तसंच आणखी सीसीटीव्ही कॅमॅरेही बसवले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आता जास्त काळजी घेतल्याचं दिसत आहे. 

Web Title: saif ali khan got discharged from hospital after 6 days of attack now looks fit and fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.