VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:44 IST2025-01-29T15:41:27+5:302025-01-29T15:44:54+5:30

सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली होती. यावेळी पोलिसांनी गाडीला धक्का देत सुरू करण्याचा प्रयत्न केला.

Saif Ali Khan attack case Police vehicle carrying accused breaks down on the way to bandra court Video | VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का

VIDEO : सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी पडली बंद, पोलिसांनी दिला धक्का

Saif Ali Khan Knife Attack: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Case) प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला (Shariful Islam Shahzad) आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाकडून आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण, यातच एक व्हिडीओ समोर आहे. ज्यामध्ये पोलिस (Mumbai Police) हे आरोपी मोहम्मद शहजादच्या () गाडीला धक्का देताना दिसत आहेत. सुनावणीसाठी आरोपी मोहम्मद शहजादला जेव्हा पोलिस स्टेशनमधून कोर्टाकडे नेत होते, तेव्हा पोलिसांची गाडी बंद पडली. 

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीस कोठडी आज संपली होती. त्यामुळे त्याला आज वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार होते. पोलिस हे आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला न्यायालयात घेऊन जाण्यासाठी बाहेर पडले. आरोपीला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलिस निघाले. पण, पोलिस स्टेशनपासून सुमारे १०० मीटर अंतरावर अचानक गाडी बिघडली. यानंतर पोलिसांना उतरुन गाडीला धक्का दिला. पण, पोलिसांनी धक्का मारुनही गाडी काही सुरू झाली नाही. अखेर पोलिसांना आरोपीला लगेच दुसऱ्या गाडीत हलवलं आणि न्यायालयात नेले. याचा व्हिडीओ IANS कडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक देखील आश्चर्यचकित झालेत.

आरोपी मोहम्मद शहजाद याला १९ जानेवारीला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो पोलिस कोठडीमध्ये आहे. आता तो १४ दिवस न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. आता आरोपीच्या वकिलांकडून दोन ते तीन दिवसांमध्ये आरोपीच्या जामिनासाठी सेशन कोर्टात अपील करण्यात येणार आहे. तर आरोपीच्या वडिलांनीही बांगलादेशमधून माझ्या मुलाचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून, पोलिसांनी त्याला विनाकारण गोवल्याचा आरोप केलाय.
 

Web Title: Saif Ali Khan attack case Police vehicle carrying accused breaks down on the way to bandra court Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.