पापाराझींना पाहताच स्टार किडने लपवला चेहरा, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:13 IST2024-09-18T13:12:55+5:302024-09-18T13:13:11+5:30
इब्राहिम अली खानचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्याची एकही संधी पापाराझी सोडत नाहीत.

पापाराझींना पाहताच स्टार किडने लपवला चेहरा, नेटकऱ्यांनी केले ट्रोल
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) त्या स्टारकिड्स पैकी एक आहे, जो पदार्पणा आधीच मीडियामध्ये चर्चेत असतो. इब्राहिम अगदी त्याच्या वडिलांसारखाच दिसतो अशा प्रतिक्रिया त्याला येत असतात. त्याच्या गुड लूक्सवर तरुणी फिदा आहेत. सोशल मीडियावर मोस्ट हँडसम स्टारकिड म्हणून त्याची चर्चा असते. पण, आता तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
इब्राहिम अली खानचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करण्याची एकही संधी पापाराझी सोडत नाहीत. अलीकडेच सैफ अलीचा मुलगा मुंबईत स्पॉट झाला. पण पापाराझींना पाहताच त्याने चेहरा लपवला, त्यामुळे त्याला ट्रोल केले जात आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये इब्राहिम हा जीममधून बाहेर पडताना दिसून येतोय. यावेळी त्याने आपला चेहरा लपवला. पापराझींना चेहरा न दाखवता तो गाडीच्या आत बसल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं.
इब्राहिम अली खानचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, 'ओव्हर ॲक्टिंगचे 50 रुपये कट'. दुसऱ्याने लिहिले, 'हा माझा मित्र आहे, जो आता तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही'. तर एकाने लिहिले की, 'या ओव्हर ॲक्टिंगला मी काय नाव देऊ?'.
इब्राहिम अली खान लवकरच 'सरजमीन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, काजोल, राजेश शर्मा, मिहिर आहुजा आणि इतर स्टार्स दिसणार आहेत. इब्राहिमने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मधून केली होती. करण जोहरच्या या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.