'दबंग ३'मधील सई मांजरेकरचा लूक आला समोर, ट्रेलर उद्या येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:36 IST2019-10-22T19:35:58+5:302019-10-22T19:36:43+5:30
सई मांजरेकर 'दबंग ३'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.

'दबंग ३'मधील सई मांजरेकरचा लूक आला समोर, ट्रेलर उद्या येणार भेटीला
बॉलिवूडचा दबंग खान सलमान त्याचा आगामी चित्रपट 'दबंग ३'मुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील सर्व कलाकारांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात येत आहे. चुलबुल पांडे, बाली उर्फ किच्छा सुदीप व रज्जो म्हणजेच सोनाक्षी सिन्हा यांचे पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर आता सई मांजरेकरचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.
निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर 'दबंग ३'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटातील तिचा लूक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात ती खुशीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सईचा चाहत्यांशी परिचय करून देण्यासाठी निर्मात्यांनी एक मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये सलमानने म्हटलं आहे की, हिच्या खुशीसाठी मी कोणकोणावर प्रेम करू. ही लाईन चाहत्यांना खूप भावते आहे.
दबंग ३चा ट्रेलर उद्या प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभूदेवाने केले आहे. हा सिनेमा २० डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
सलमान व सईशिवाय सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सईचे बाबा अर्थात महेश मांजरेकर हेही कॅमिओ रोलमध्ये या चित्रपटात दिसणार आहेत.महेश मांजरेकर व सलमान यांच्यात चांगली मैत्री आहे. मुलीच्या डेब्यूकडे महेश मांजरेकर जातीने लक्ष देत आहेत.
मुंबई मिररने दिलेले वृत्त खरे मानाल तर, महेश यांनी आपल्या मुलीसाठी ‘नो डेटींग क्लॉज’ जारी केला आहे. सईने केवळ आणि केवळ तिच्या अॅक्टिंगवर लक्ष द्यावे, अशी महेश मांजरेकर यांची इच्छा आहे.