अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:43 IST2025-06-09T17:42:59+5:302025-06-09T17:43:26+5:30

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबाबत भाष्य केलं. 

sachin pilgaonkar talk about jaya bachchan and amitabh bachchan | अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..."

अमिताभ बच्चन यांना 'या' नावाने हाक मारतात सचिन पिळगावकर, म्हणाले- "लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात, पण मी..."

सचिन पिळगावकर यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. 'नदियो के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी' हे त्यांचे गाजलेले हिंदी सिनेमे. सचिन पिळगावकर यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह 'सत्ते पे सत्ता', 'त्रिशुल', 'शोले' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याबाबत भाष्य केलं. 

लोकमत फिल्मीच्या नो फिल्टरमध्ये सचिन पिळगावकरांनी हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, "आमचं नातं खूप चांगलं आहे. इतर लोक त्यांना अमितजी म्हणतात. काही लोक त्यांना बच्चन साहेब म्हणतात. मी त्यांना भाई म्हणतो. आणि हे सगळं सुरू झालं ते सत्ते पे सत्ता या सिनेमापासून... त्याआधीही आम्ही काम केलेलं आहे. नाही असं नाही...आम्ही शोलेमध्ये होतो. त्यानंतर त्रिशूलमध्ये पण होतो. त्यानंतर तो एक रॅपो वेगळा झाला. पण, मी जयाजींच्या जास्त जवळ आहे". 


"मी जयाजींसोबत एकही सिनेमात काम केलं नाही. माझ्याशी त्या खूपच गोड बोलायच्या. त्या माझे खूप लाड करतात. आणि बहुतेक काही वेळेला ते अमितजींना आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात ये जया के दहेज में आया है...त्यांना कदाचित असं वाटत असेल की हिच्याजवळ का तो? माझ्या का नाही? असं पण त्यांना कदाचित वाटत असेल. पण, तो एकमेकांचा रॅपो असतो. आम्ही एकत्र काम केलं पण तेवढी जवळीक नाही. जेवढं काम न करता जयाजींसोबत आहे. तर त्या हिशोबाने पण आम्ही सगळे एकत्रच आहोत. आम्ही एकमेकांपासून दूर नाही", असंही ते पुढे म्हणाले. 

Web Title: sachin pilgaonkar talk about jaya bachchan and amitabh bachchan