दीपवीरच्या लग्नाची पहिली बातमी मिळाली होती इंडस्ट्रीतील 'या'व्यक्तिला, नाव वाचून तुम्हाला ही वाटेल नवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 11:34 IST2019-05-28T11:06:51+5:302019-05-28T11:34:21+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल पैकी एक आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले.

Sabyasachi was the first who know about deepika- ranveer weddings | दीपवीरच्या लग्नाची पहिली बातमी मिळाली होती इंडस्ट्रीतील 'या'व्यक्तिला, नाव वाचून तुम्हाला ही वाटेल नवल

दीपवीरच्या लग्नाची पहिली बातमी मिळाली होती इंडस्ट्रीतील 'या'व्यक्तिला, नाव वाचून तुम्हाला ही वाटेल नवल

ठळक मुद्दे ''आम्हाला हे लग्न भारतीय संस्कृतीला डोळ्यासमोर ठेवून करायचे होते''दीपिका सध्या 'छपाक'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल पैकी एक आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले. इटलीतील लेक कोमोमध्ये लग्न केल्यानंतर दीपवीरने भारतात तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. दीपवीरचे लग्न अनेक महिने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिले. 

झूमच्या रिपोर्टनुसार  दीपिका म्हणाली.'' सगळ्यात आधी आमच्या लग्नाची बातमी फॅशन डिझाइनर सब्यसाची कळली होती. आम्हाला हे लग्न भारतीय संस्कृतीला डोळ्यासमोर ठेवून करायचे होते. कारण मी आणि रणवीर त्याचाच एक भाग आहोत.'' दीपिकाने लग्नात सब्यसाची डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. कदाचित याच कारणामुळे तिने सब्यसाचीला सगळ्यात आधी सांगितले असेल. पुढे दीपिका म्हणाली, ''लग्नाची तयारी मी एकटीच करत होते. रणवीर त्याच्या कामात खूप बिझी होता. त्यामुळे जेव्हा सर्व गोष्टी आमच्या नियंत्रणात आल्या त्यावेळी मी लग्नाची ऑफिशीयल घोषणा केली.'' 


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, दीपिका सध्या 'छपाक'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. मेघना गुलजार यासिनेमाचे दिग्दर्शन करतेय.

तर रणवीर सिंग '८३' सिनेमाचे शूटिंग करतोय. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकारतोय. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १० एप्रिल, २०२०ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.     

Web Title: Sabyasachi was the first who know about deepika- ranveer weddings