अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:31 IST2025-07-26T13:30:35+5:302025-07-26T13:31:13+5:30
चित्रपट निर्मात्याला रुचीने भर कार्यक्रमात मारहाण केली आहे. 'सो लाँग व्हॅली' या रुचीच्या सिनेमाच्या मुंबईतील स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री रुची गुजरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चित्रपट निर्मात्याला रुचीने भर कार्यक्रमात मारहाण केली आहे. निर्माता आणि अभिनेता असलेल्या करण सिंह चौहानच्या अंगावर रुची धावून गेली. 'सो लाँग व्हॅली' या रुचीच्या सिनेमाच्या मुंबईतील स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत रुची गुजर आरडाओरडा करताना दिसत आहे. त्यानंतर ती करण सिंह चौहानच्या अंगावर धावून जाते. सगळे जण थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. पण, तेवढ्यातच ती पायतली चप्पल काढून फेकून मारते. चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झालेल्या प्रकाराने सगळेच हादरले. या प्रकारामुळे तिथे असलेल्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. या संपूर्ण प्रकारामुळे चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
नेमकं प्रकरण काय?
रुची गुज्जर आणि चित्रपटाचा निर्माता करण सिंह चौहान यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारावरुन वाद सुरू होते. करणने रुचीची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. याच कारणामुळे करणला समोर बघताच रुची भडकली आणि तिने थेट त्याच्यावर हातच उगारला. करणविरोधात रुचीने पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रुचीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी करणविरोधात कलम 318(4), 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
'सो लाँग व्हॅली' या सिनेमात रुची गुज्जर मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात त्रिधा चौधरी, आकांक्षा पुरी, विक्रम कोचर, मन सिंह, अलिशा परवीन अशी स्टारकास्ट आहे. मन सिंह यांनी सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. तर करण सिंह चौहान सहनिर्माता आहे.