जूही चावला आणि रोजा फेम मधू यांच्यात आहे जवळचं नातं, आजपर्यंत कुणालाच नव्हतं माहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 14:00 IST2021-10-15T13:59:16+5:302021-10-15T14:00:19+5:30

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर मधू नुकत्याच रिलीज झालेल्या थलायवी सिनेमात दिसली होती. या सिनेमात मधूने व्हीएन जानकी रामाचंद्रनी भूमिका साकारली होती.

Roja fame actress Madhoo is real life devrani of Juhi Chawla | जूही चावला आणि रोजा फेम मधू यांच्यात आहे जवळचं नातं, आजपर्यंत कुणालाच नव्हतं माहीत

जूही चावला आणि रोजा फेम मधू यांच्यात आहे जवळचं नातं, आजपर्यंत कुणालाच नव्हतं माहीत

'द कपिल शर्मा शो' मध्ये लवकरच बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री  दिसणार आहेत. जूही चावला, मधू, आएशा जुल्का कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये येऊन दिलखुलास गप्पा करणार आहेत. समकालीन अभिनेत्री पहिल्यांदाच एका मंचावर  अशाप्रकारे येणार असून धमाल करणार आहेत.

कपिल शर्मा शोमध्ये मधू आणि जूही चावला यांच्यातील नातं समोर आलं आहे. ज्याबाबत आजपर्यंत फार कुणाला माहीत नव्हतं. एपिसोडमध्ये कपिल शर्माने जूही चावलाला त्यांच्या आणि मधूमधील नात्याबाबत विचारलं. तर याबाबत कुणालाच माहीत नव्हतं. तेव्हा जूही चावलाने सांगितलं की, ही माझी जाऊबाई आहे. मधू आणि जूही चावला यांच्यात जाऊ-जाऊचं नातं आहे. हे कदाचित कोणत्याच फॅनला माहीत नसेल.

कपिलने त्यानंतर जूही आणि मधू यांची गंमत करत विचारले की, तुमचा पती मोठा यांच्या पतीपेक्षा...त्या हिशेबाने. नाही तर हिरोईन तर एकमेकींपेक्षा लहानच असतात नेहमी. कपिलचा हा जोक ऐकून तिथे उपस्थित सगळेच लोक हसू लागले होते.
मधूने आनंद शाहसोबत लग्न केलं आहे. ते जूही चावलाचे पती जय मेहताचे चुलत भाऊ आहेत. जूही चावला यांनी जय मेहता यांच्यासोबत १९९६ मध्ये लग्न केलं होतं. या लग्नातून जूहीला दोन मुलं आहेत. ज्यांची नावं जान्हवी आणि अर्जुन आहे.

वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर मधू नुकत्याच रिलीज झालेल्या थलायवी सिनेमात दिसली होती. या सिनेमात मधूने व्हीएन जानकी रामाचंद्रनी भूमिका साकारली होती. हा सिनेमा तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. यात जयललिता यांची भूमिका कंगना राणौतने साकारली आहे.
 

 

Web Title: Roja fame actress Madhoo is real life devrani of Juhi Chawla