"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:32 IST2025-06-05T18:32:20+5:302025-06-05T18:32:44+5:30

"ते लढले, टिकून राहिले आणि...", महावश काय म्हणाली?

rj mahavash special post for yuzvendra chahal after pbks team lose ipl final against rcb | "दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट

"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट

आयपीएल २०२५ (Ipl 25) नुकतंच संपलं आहे. गेल्या १८ वर्षात पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ट्रॉफी नावावर केली. विराट कोहलीसाठी हा क्षण खास होता. संघाने पंजाब किंग्सला हरवत विजय मिळवला. पंजाबचा संघ शेवटपर्यंत लढला आणि थोडक्यात हरला. पंजाब संघातील लेग स्पिनर युजवेंद्र चहलसाठी (Yuzvendra Chahal) त्याची कथित गर्लफ्रेंड आरजे महावशने (RJ Mahavash) खास पोस्ट लिहिली आहे.

आरजे महावशने इन्स्टाग्रावर आयपीएलच्या या सीझनचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबत ती लिहिते, "ते लढले, टिकून राहिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत खेळले. युजवेंद्र चहलसाठी खास पोस्ट कारण अनेकांना माहित नाही की दुसऱ्या सामन्यावेळी त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. तसंच त्याच्या बोटांनाही फ्रॅक्चर झालं होतं. हा मुलगा संपूर्ण सीझन हीच दुखापत घेऊन खेळला. आम्ही त्याला ओरडताना आणि वेदनेत कळवळताना पाहिलं. पण त्याने कधीच हार मानली नाही. खरंच तुझ्यात योद्ध्यासारखीच जिद्द आहे. 


ती पुढे लिहिते, "टीम शेवटच्या चेंडूपर्यंत लढली. यावर्षी या संघाला पाठिंबा देणं हे खरोखरंच माझं भाग्यच आहे. वेल प्लेड बॉईज. या फोटोतील सर्वांना खूप प्रेम. पुढच्या वर्षी भेटू. आणि हो आरसीबीचं आणि त्यांच्या चाहत्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रत्येक जण मेहनतीने खेळला. क्रिकेट आणि आयपीएल...देवा पुन्हा...भारतीयांसाठी खरोखरंच हा सण आहे."

आरजे महावश आणि युजवेंद्र चहल फायनल नंतर विमानतळावरही दिसले. अद्याप दोघांनीही त्यांच्या कथित अफेअरची कबुली दिलेली नाही. युजवेंद्र चहलचा यावर्षीच धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. आणि नंतर लगेचच त्याच्या आणि महावशच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. संपूर्ण आयपीएल सीझन महावश चहलसोबत होती. ती अनेकदा पंजाब टीमसोबत दिसली. तसंच टीमच्या हॉटेलमध्येही ती राहिली. तिचे अनके फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आता आणखी उधाण आलं आहे.

Web Title: rj mahavash special post for yuzvendra chahal after pbks team lose ipl final against rcb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.