"लोभ, खोटेपणा आणि फसवणूक...", युजवेंद्र चहलने धनश्रीला ४.५ कोटींची पोटगी देण्याचं मान्य करताच RJ महावशची पोस्ट

By कोमल खांबे | Updated: March 20, 2025 10:54 IST2025-03-20T10:53:30+5:302025-03-20T10:54:07+5:30

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्रीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची पोटगी देणार असल्याचं क्रिकेटरने मान्य केलं आहे. यानंतर चहलसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसलेल्या RJ महावशने पोस्ट शेअर केली आहे.

rj mahavash shared criptic post after yuzvendra chahal accept to giving almony of 4.5cr to dhanashree verma | "लोभ, खोटेपणा आणि फसवणूक...", युजवेंद्र चहलने धनश्रीला ४.५ कोटींची पोटगी देण्याचं मान्य करताच RJ महावशची पोस्ट

"लोभ, खोटेपणा आणि फसवणूक...", युजवेंद्र चहलने धनश्रीला ४.५ कोटींची पोटगी देण्याचं मान्य करताच RJ महावशची पोस्ट

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर आज त्यांचा घटस्फोट होत आहे. घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्रीला ४ कोटी ७५ लाख रुपयांची पोटगी देणार असल्याचं क्रिकेटरने मान्य केलं आहे. यानंतर चहलसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसलेल्या RJ महावशने पोस्ट शेअर केली आहे. 

RJ महावशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा कूल लूक पाहायला मिळत आहे. पण, फोटोंपेक्षा जास्त RJ महावशच्या पोस्टच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे. "लोभ, खोटेपणा आणि फसवणूक याच्यापासून लांब आहे...देवाची कृपा आहे तरीही आज उभी आहे", असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे. RJ महावशने केलेल्या या पोस्टची चर्चा रंगली आहे. तिची ही पोस्ट चहलनेदेखील लाइक केली आहे. 


युजवेंद्र-धनश्रीचा आज होणार घटस्फोट!

बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, चहल-धनश्रीने कौटुंबिक न्यायालयात केलेली घटस्फोटाची याचिका काही कारणास्तव फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या कोर्टात आज सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. तसेच सहा महिन्यांचा 'कुलिंग ऑफ पिरेड' रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले. गेली अडीच वर्षे धनश्री आणि चहल एकमेकांपासून विभक्त राहत असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अनिवार्य असलेला सहा महिन्यांचा 'कुलिंग ऑफ पिरेड' रद्द करण्याचे निर्देश दिले. तसेच, चहलच्या IPL सहभागाचा विचार करता, या जोडप्याच्या घटस्फोटाबाबत गुरुवारपर्यंत अंतिम निर्णय घेऊन त्याला 'घटस्फोटाचा जाहीरनामा' ( Divorce Decree ) दिला जावा असेही सांगण्यात आले.

किती रुपये पोटगी दिली जाणार?

युजवेंद्र चहल याने घटस्फोटाच्या अर्जाच्यावेळीच ४ कोटी ७५ लाखांची पोटगी देण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले होते. या मुद्द्यावर न्यायालयाने होकार दर्शवला आणि दोन्ही बाजूंच्या सामंजस्याने म्युच्यूअल घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश कौटुंबिक न्यायालयाला दिले. मिळालेल्या माहितीनुसार, ४.७५ कोटींच्या एकूण पोटगीपैकी २.३७ कोटींची पोटगी आधीच धनश्रीला ट्रान्सफर करून झाली असल्याचे म्हटले आहे. तर उर्वरित पोटगीची रक्कम घटस्फोटाचा जाहीरनामा मिळाल्यानंतर देण्याची तजवीज समुपदेशकाच्या मध्यस्थी करण्यात दिली.

Web Title: rj mahavash shared criptic post after yuzvendra chahal accept to giving almony of 4.5cr to dhanashree verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.