सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:50 IST2021-09-13T17:49:44+5:302021-09-13T17:50:11+5:30
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळते आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोत ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोझ देताना दिसते आहे. या फोटोत तिने ब्लॅक रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. यासोबतच तिने टॉप आणि मॅचिंग पँट घातली आहे.
रिया चक्रवर्तीने ब्लॅक ब्रालेटमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'शांतता'. नारी शक्ती.
रिया चक्रवर्तीच्या या फोटोवर शिवानी दांडेकर, अनुष्का रंजन आणि अनुष्का दांडेकरने कमेंट केली आहे. रिया चक्रवर्तीने नुकतेच इंस्टाग्राम तिचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते.
रिया चक्रवर्ती नुकतीच चेहरे चित्रपटात पहायला मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात सिद्धांत कपूर, अनु कपूर आणि रघुवीर यादव हेदेखील प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला.
रिया चक्रवर्तीने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. तिच्या चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे. ती खूप सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मागील वर्षी सुशांत सिंग राजपूतचे निधन झाले. त्याने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर तिला खूप ट्रोल केले होते.
सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीची बऱ्याचदा चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या वडिलांनी तिच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आणि १५ कोटी बळकावल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या निधनानंतर ड्रग्स कनेक्शन समोर आले होते आणि या प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती.