रितेश देशमुखने सासूबाईंसाठी शेअर केली प्रेमळ पोस्ट, 'या' नावानं हाक मारतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:37 IST2025-12-08T13:25:31+5:302025-12-08T13:37:01+5:30
नुकतंच रितेशनं जिनिलियाची आई म्हणजेच त्याच्या सासूबाईंसाठी पोस्ट शेअर केली आहे.

रितेश देशमुखने सासूबाईंसाठी शेअर केली प्रेमळ पोस्ट, 'या' नावानं हाक मारतो!
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे, जी मराठी सिनेसृष्टीतही खूप चर्चेत आहे. ते महाराष्ट्राचे लाडके 'दादा-वहिनी' म्हणून ओळखले जातात. रितेश आणि जिनिलिया ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची १३ वर्षे खूपच कमाल होती. देशमुख कुटुंबात लग्न करून आल्यानंतर जिनिलियानं सर्वांना आपलंसं केलं. अगदी तसंच रितेशनंही जिनिलियाच्या आई-वडिलांना तेवढंच प्रेम आणि आदर दिला आणि त्यांना आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनवलं. तो साईबाईंना "मम" या प्रेमळ नावाने हाक मारतो. नुकतंच रितेशनं जिनिलियाची आई म्हणजेच त्याच्या सासूबाईंसाठी पोस्ट शेअर केली आहे.
नुकताच जिनिलियाच्या आईचा वाढदिवस पार पडला आणि या खास निमित्ताने रितेश देशमुखने त्यांच्यासाठी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक आणि प्रेमळ पोस्ट शेअर केली आहे. रितेशनं आपल्या पोस्टमध्ये सासूबाईंबद्दल अपार आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. पोस्टमध्ये तो लिहितो, "प्रिय मम... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही खरोखरच आमच्या कुटुंबाचं हृदय आहात. ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. तुम्ही संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी खूप मेहनत घेतलीत, दोन अप्रतिम मुलांना वाढवलंत, ज्यांनी तुम्हाला नेहमी अभिमान वाटेल असं काम केलं. आणि आता तुमचे नातवंडे तुम्हाला पाहताक्षणी आनंदाने उजळून निघतात".
पोस्टमध्ये रितेशनं आपल्या सासूबाईंच्या आणि सासऱ्यांच्या नात्याचाही उल्लेख करत म्हटलं की, "पॉप्स अजूनही तुमच्याकडे तसंच पाहतात, जणू तुम्ही त्यांचं संपूर्ण विश्व आहात. तुमचं शांत सामर्थ्य, असीम प्रेम आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याची ताकद मला दररोज प्रेरणा देते. आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही आम्हाला जितकं प्रेम देता, त्याच्या किमान अर्धं जरी तुम्हाला आज जाणवलं तरी खूप आहे. कारण आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!", अशी भावना त्यानं व्यक्त केली.