"प्रिय बायको..." जिनिलियाचा वटपौर्णिमा पूजेचा व्हिडीओ शेअर करत रितेशनं व्यक्त केलं प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:41 IST2025-06-11T10:41:33+5:302025-06-11T10:41:48+5:30

वटपौर्णिमेला जिनिलियाची पूजा, रितेश म्हणाला 'प्रिय बायको, तू माझी ताकद'"

Riteish Deshmukh Shares Special Post For Wife Genelia Deshmukh Vat Purnima 2025 | "प्रिय बायको..." जिनिलियाचा वटपौर्णिमा पूजेचा व्हिडीओ शेअर करत रितेशनं व्यक्त केलं प्रेम

"प्रिय बायको..." जिनिलियाचा वटपौर्णिमा पूजेचा व्हिडीओ शेअर करत रितेशनं व्यक्त केलं प्रेम

Vat Purnima 2025: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे एक आदर्श जोडपे आहेत. या दोघांची केमेस्ट्री कमाल आहे. महाराष्ट्राचे हे लाडके दादा वहिनी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक मजेशीर रील व्हिडिओदेखील ते दोघे शेअर करत असतात.  जिनिलियानेही काल वटपौर्णिमा साजरी केली. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आता पती रितेशनं तो व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत जिनिलियावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

देशमुखांची सून जिनिलिया ही केवळ एक यशस्वी अभिनेत्री नाही, तर एक संस्कारी सून, प्रेमळ पत्नी आणि आईदेखील आहे. वटसावित्रीच्या दिवशी तिने पारंपरिक पेहरावात वटवृक्षाची पूजा केली, नवरा रितेशच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ तिनं "आय लव्ह यू रितेश" म्हणत पतीला टॅग केलं.  हाच व्हिडीओ रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर रिशेअर करत लिहलं, "प्रिय बायको...– तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी खरंच खूप भाग्यवान आहे. तुझ्यामुळे मी खरंच खूप आनंदी आहे. तू माझा आधार आहेस, शक्ती आहेस अन् माझं संपूर्ण जगं आहेस. आय लव्ह यू", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या. 

रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नाला इतकी वर्ष झाली असली तरी त्यांचं नात कायम नव्याने खुलताना पाहायला मिळतं. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. तर लग्नाच्या आधी जवळपास १० वर्षे ते एकमेंकाना डेट करत होते.  या जोडीला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली जिनिलिया जेव्हा देशमुख कुटुंबात सून म्हणून आली.  तेव्हापासून ती रितेशची पत्नी नाही तर देशमुख कुटुंबाच्या सून म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आली आहे. तिनं मराठी संस्कृती, परंपरा, रितीरिवाज या सगळ्या गोष्टी मोठ्या आवडीने शिकून घेतल्यात.  ती प्रत्येक मराठी सण देखील हौसेने साजरे करते.


Web Title: Riteish Deshmukh Shares Special Post For Wife Genelia Deshmukh Vat Purnima 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.