ऋषी कपूर यांचं शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'शी खास कनेक्शन, DDLJ बद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 11:13 IST2024-05-02T11:09:11+5:302024-05-02T11:13:37+5:30

ऋषी कपूर यांनी DDLJ चित्रपटात काम केलेलं नाही. पण, तरीही त्यांचं या सिनेमाशी खास कनेक्शन आहे.   

Rishi Kapoor had a connection with Shahrukh Khan's 1995 film DDLJ, Karan Johar has revealed | ऋषी कपूर यांचं शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'शी खास कनेक्शन, DDLJ बद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

ऋषी कपूर यांचं शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'शी खास कनेक्शन, DDLJ बद्दल 'या' गोष्टी माहितीयेत का?

बॉलिवूडच्या आयकॉनिक चित्रपटांची नावं घेताना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाचं नाव अग्रक्रमी येतं. विशेष म्हणजे आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने आणि तितक्याच उत्सुकतेने पाहतात. पण, तुम्हाला माहितेय का ऋषी कपूर यांनी DDLJ चित्रपटात काम केलेलं नाही. पण, तरीही त्यांचं या सिनेमाशी खास कनेक्शन आहे.   

 ऋषी कपूर आता या जगात नसले तरी त्यांच्या आठवणी कायम चाहत्यांसोबत आहेत. ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होते, त्यांनी आपल्या करिअरमध्ये बहुतेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या बायोग्राफी ॲन सुटेबल बॉयमध्ये ऋषी कपूर आणि शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाच्या कनेक्शनचा खुलासा केला होता.

जेव्हा करण हा सिनेमात शाहरुखच्या 'राज मल्होत्रा' पात्रासाठी कपडे निवडत होता.  तेव्हा बजेट वाढल्यामुळे मुंबईच्या स्टुडिओमध्ये पडलेल्या जुन्या कपड्यांचे बॉक्स करणने काढले. त्यात त्याला एक लाल आणि पांढऱ्या रंगाचा स्वेटर सापडला. हे ते स्वटेर होतं, जे ऋषी कपूर यांनी त्यांच्या सुपरहिट चित्रपट चांदनीमध्ये परिधान केलं होतं.  ऋषी कपूर यांचे हेच स्वेटर करणने शाहरुखसाठी निवडलं.  'ना जाने मेरे दिल को क्या' गाण्यात शाहरुखने ते घातलं होतं. शाहरुखचा स्वटेरमधील लूक लूक प्रेक्षकांना खूप आवडला होता. 

Web Title: Rishi Kapoor had a connection with Shahrukh Khan's 1995 film DDLJ, Karan Johar has revealed