Kantara Hindi Trailer : साऊथमध्ये धुमाकूळ घालणारा ‘कांतारा’ आता हिंदीत येतोय, ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 13:06 IST2022-10-09T13:04:40+5:302022-10-09T13:06:04+5:30

Kantara Hindi Trailer : साऊथमध्ये या सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे आणि आता हा सिनेमा हिंदीत रिलीज होणार आहे.

Rishab Shetty’s Kantara Hindi Trailer To Release On This Date | Kantara Hindi Trailer : साऊथमध्ये धुमाकूळ घालणारा ‘कांतारा’ आता हिंदीत येतोय, ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

Kantara Hindi Trailer : साऊथमध्ये धुमाकूळ घालणारा ‘कांतारा’ आता हिंदीत येतोय, ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

Kantara Hindi Trailer : चांगल्या सिनेमाचा शोध घेणारे सिनेप्रेमी ‘कांतारा’ या कन्नड सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर पाहून क्रेझी झाले होते. पण हिंदी चित्रपट प्रेमींची थोडी निराशा झाली होती. कारण हा सिनेमा फक्त कन्नड भाषेत काही मर्यादीत स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. साऊथमध्ये या सिनेमाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे आणि आता हा सिनेमा हिंदीतही रिलीज होणार आहे. होय, 2018 साली ‘केजीएफ’ सारखा दमदार सिनेमा आणणाऱ्या होम्बाले फिल्म्सने आता ‘कांतारा’ हिंदीत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कांतारा’चा हिंदी ट्रेलरही रिलीज झाला आहे.  
राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे ‘कांतारा’चे दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनीच या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. 

‘कांतारा’ची कथा
एक राजाने देव मानल्या जाणाऱ्या एका दगडाच्या बदल्यात आपली काही जमीन गावकऱ्यांना दिली होती. आता अनेक वर्षानंतर त्या राजाची पिढी ही जमीन वापस घेऊ इच्छिते.  जमीन देण्याचा शब्द फिरवला तर अनर्थ घडेल, हे देवतेने राजाला आधीच बजावलं असतं. अशात राजाचे वंशज राजाने दिलेली जमीन परत घेऊ इच्छितात, दुसरीकडे एक फॉरेस्ट ऑफिसर गावकऱ्यांच्या विरोधात उभा राहतो. गावकरी जंगलाला नुकसान पोहोचवत असल्याचं त्याचं म्हणणं असतं. पण गावकऱ्यांच्या मते, ते जंगलाचे सेवेकरी आहेत आणि जंगलावर त्यांचा अधिकार आहे. या सगळ्या गुंत्यामुळे देवता नाराज होते. पुढे काय घडतं, तीच या चित्रपटाची कथा आहे. ही कथा साऊथ इंडियाच्या तुलू नाडू कल्चरशी संबंधित आहे.   कथेत शिवा नावाचा एक हिरो आहे. त्याच्याभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते.

कधी रिलीज होणार ‘कांतारा’
कन्नड भाषेत ‘कांतारा’ कधीच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं हिंदी व्हर्जन येत्या 14 ऑक्टोबरला रिलीज होतंय. आयुष्यमान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटासोबत ‘कांतारा’चा बॉक्स ऑफिस क्लॅश रंगणार आहे. याच दिवशी सोनाक्षी सिन्हा व हुमा कुरैशीचा ‘डबल एक्स एल’ रिलीज होतोय. शिवाय परिणीती चोप्राचा ‘कोड नेम तिरंगा’ हा सिनेमाही याचदिवशी रिलीज होतोय.

Web Title: Rishab Shetty’s Kantara Hindi Trailer To Release On This Date