कपूर घराण्यातील 'ही' व्यक्ती वयाच्या ४४ व्या वर्षी करतेय हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:32 IST2025-05-02T13:30:55+5:302025-05-02T13:32:59+5:30
इतक्या उशिरा अभिनय क्षेत्रात येण्याचं कारण काय? म्हणाली...

कपूर घराण्यातील 'ही' व्यक्ती वयाच्या ४४ व्या वर्षी करतेय हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण, म्हणाली...
मनोरंजनविश्वात कपूर घराण्याचं मोठं नाव आहे. या कुटुंबातील जवळपास सगळेच सदस्य अभिनय करतात. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते आथा रणबीर, करीनापर्यंतची पिढी अभिनय करत आहेत. इतकंच नाही तर प्रत्येकजण यशस्वी झाला असून त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कुटुंबातील एक सदस्य मात्र वयाच्या ४४ व्या वर्षी पदार्पण करत आहे. कोण आहे ती?
बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता रणबीर कपूर आघाडीवर आहे. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा मुलगा रणबीरचे अनेक चाहते आहेत. त्याच्या अभिनयाचं कायम कौतुक होतं. आात रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरही (Riddhima Kapoor) हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. इतकी वर्ष ती अभिनयापासून दूर होती. मात्र आता वयाच्या ४४ व्या वर्षी तिने अभिनय करण्याचं ठरवलं आहे. आपल्या डेब्यूविषयी बोलताना ती म्हणाली, "मी एका सिनेमाचं शूट करत आहे. जून महिन्यापर्यंत हिमालयातील डोंगराळ भागात हे शूट चालणार आहे. मी आणि माझं कुटुंब माझ्या या पदार्पणासाठी खूप उत्साहित आहोत. मी शूटिंगवेळी माझ्या आईसोबतच होते आणि आम्ही रिहर्सलही केली. उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने माझी मुलगी समायराही मला भेटायला आली. मी स्क्रिप्टचे फोटो कुटुंबातील सदस्यांना पाठवते आणि मला त्यांच्याकडून काही सजेशन आणि पाठिंबा मिळतो."
ती पुढे म्हणाली, "मी अभिनयात येईन असं अजिबातच ठरवलं नव्हतं. जेव्हा मला विचारलं गेलं मी सहज हो म्हणाले. मी स्क्रिप्ट ऐकली आणि मला गोष्ट खूप आवडली. पण सिनेमात येणं हा कधीच माझा प्लॅन नव्हता."
रिद्धिमा कपूरने २००६ सालीच बिझनेसमन भरत साहनीसोबत लग्नगाठ बांधली. तिला समायरा ही १४ वर्षांची मुलगी आहे. रिद्धिमा दिसायला खूप सुंदर असून अनेकदा तिला तू अभिनेत्री का झाली नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. आता अखेर ती वयाच्या ४४ व्या वर्षी पदार्पण करत आहे.