शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:44 IST2022-10-04T16:24:02+5:302022-10-04T16:44:13+5:30

Richa Chadha-Ali Fazal Wedding First Photos: रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकले आहेत. या कपलने लग्नाला खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

Richa Chadha Ali Fazal wedding couple royal look in lucknow pre wedding function | शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos

शादी मुबारक हो! Richa Chadha-Ali Fazal यांचं रॉयल लग्न, पाहा Wedding First Photos

रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) लग्नबंधनात अडकले आहेत.बी-टाऊनच्या मोस्ट अॅडॉरेबल कपलच्या लग्नाचे पहिले फोटोही समोर आले आहेत. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांचा ब्राइडल आउटफिटमधला लूक पाहण्यासारखा आहे. दिल्लीत प्री-वेडिंग पार पडल्यानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी लखनौमध्ये लग्न केले. या कपलच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करतायेत. 

दोघांनीही लग्नात सेम कलरचे कपडे परिधान केले होते. सुप्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केले. अलीने सोनेरी आणि बेज रंगाची शेरवानी घातली आहे आणि रिचा ऑफ व्हाइट आउटफिटमध्ये सुंदर दिसत आहे.सोबतच रिचाने हेवी ज्वेलरीही परिधान केली होती. लग्नाच्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि प्रेम स्पष्टपणे दिसत आहे.

हे फोटो शेअर करत अलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक दौर हम भी हैं  एक सिलसिला तुम भी हो.' तर हे फोटो शेअर करताना रिचाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ' 'तू मला भेटलास.' फोटोंमध्ये रिचा आणि अली दोघेही रॉयल कपल सारखे दिसत आहेत. या कपलने लग्नाला खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

लग्नानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल मुंबईत त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन देणार आहेत. या रिसेप्शनला बॉलिवूडचे अनेक  सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. 

Web Title: Richa Chadha Ali Fazal wedding couple royal look in lucknow pre wedding function