रिया चक्रवर्तीने हायर केला देशातील सर्वात महागडा वकील, याआधी लढले होते संजय-सलमानच्या केस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 14:53 IST2020-07-29T14:42:27+5:302020-07-29T14:53:23+5:30

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, रियानेच सुशांतला आत्महत्या कऱण्यासाठी भाग पाडलं होतं.

Rhea Chakraborty hired the most expensive lawyer in her defense Lawyer Satish Maneshinde | रिया चक्रवर्तीने हायर केला देशातील सर्वात महागडा वकील, याआधी लढले होते संजय-सलमानच्या केस!

रिया चक्रवर्तीने हायर केला देशातील सर्वात महागडा वकील, याआधी लढले होते संजय-सलमानच्या केस!

अभिनेता सुंशात सिंह राजपूत याचे वडील केके सिंह यांनी अखेर सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. तक्रारीनंतर ताज्या माहितीनुसार रियाने स्वत:चा बचाव करण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलाला हायर केलं आहे. दिल्ली येथील वकील सतीश मानेशिंदे हे याआधी सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढले आहेत.

सुशांतच्या  आत्महत्येच्या तपासाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यांचा आरोप आहे की, रियानेच सुशांतला आत्महत्या कऱण्यासाठी भाग पाडलं होतं. आता अशी माहिती समोर येत आहे की, रियाने वकील  मानेशिंदे यांना हायर केलंय. मानेशिंदे हे देशातील सर्वात महागडे आणि प्रसिद्ध वकिल आहेत. ते सलमान खानच्या १९९८ च्या ब्लॅकबक आणि संजय दत्तच्या १९९३ च्या मुंबई ब्लास्ट केसचे वकील होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानेशिंदे यांनी जामिनासाठी मंगळवारीच पेपर्स साइन केले होते. कारण ज्यूनिअर वकील आनंदिनी फर्नांडिसला रियाच्या घराबाहेर बघण्यात आलं होतं. सुशांतच्या वडिलांनी ७ पानांच्या एफआयआरमध्ये सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रूपये ट्रान्सफर झाल्याबाबत तक्रार केली आहे. त्यांनी लिहिले की, रिया आणि तिच्या परिवाराने मुद्दामहून सुशांतला मानसिक रूपाने आजारी करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, आतापर्यंत सीबीआय चौकशीची मागणी का केली नाही? असा प्रश्न एका फॅनने विचारला होता.  सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने याबद्दलचा खुलासा केला आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना किर्तीने यामागचे नेमके कारण सांगितले. ‘सुशांत कुटुंबीय सीबीआय चौकशीच्या मागणीवर गप्प का?’ असा सवाल सुशांतच्या एका चाहत्याने श्वेताला विचारला होता. या चाहत्याला श्वेताने उत्तर दिलेय. ‘ आम्ही मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होण्याची आणि रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहोत,’, असे तिने यावर म्हटले आहे. 

हे पण वाचा: 

सुशांतच्या बहिणीसोबत झाले होते रियाचे भांडण, नवा खुलासा वाढवणार अभिनेत्रीचे टेन्शन

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

Web Title: Rhea Chakraborty hired the most expensive lawyer in her defense Lawyer Satish Maneshinde