Riya had a quarrel with Sushant's sister, the actress's tension will increase with the new revelation | सुशांतच्या बहिणीसोबत झाले होते रियाचे भांडण, नवा खुलासा वाढवणार अभिनेत्रीचे टेन्शन

सुशांतच्या बहिणीसोबत झाले होते रियाचे भांडण, नवा खुलासा वाढवणार अभिनेत्रीचे टेन्शन

सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात पटनातील राजीव नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि रियावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर सुशांतच्या अकाउंटमधून कोटी रुपये काढल्याचा आणि तिचा नंबर बदलवण्याचा आरोपही केला आहे. इतकेच नाही तर सुशांतची मुंबईत राहणाऱ्या बहिणीसोबत रियाने भांडणं केल्याचंही समोर आले आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाशी निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीने सुशांतच्या मानसिक स्वास्थ्यावरील तणावाबद्दल कधीच त्याच्या कुटुंबाला सांगितले नाही. गेल्या एक वर्षात सुशांतचे त्याच्या वडिलांशी फक्त पाच वेळाच बोलणे झाले होते. तसेच मुंबईत राहणाऱ्या सुशांतच्या बहिणीसोबत रियाची बऱ्याचदा भांडणं झाली होती.


सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनाही भेटले आहेत आणि एक पोलीस महिला नियुक्त करण्यास सांगितले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीच्या इथे बिहार पोलीस काही पोलिस आणि महिला पोलिसांसोबत पोहचू शकतात. या प्रकरणी रियाच्या विरोधात ते कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. रिया सुशांतला ब्लॅकमेल करत होती. त्याला मनोरूग्ण ठरवण्याची धमकी देत होती, असे अनेक आरोप त्यांनी आपल्या एफआयआरमध्ये केले आहेत. सुशांतच्या बँक खात्यातून 17 कोटी गेल्या वर्षभरात काढले गले आणि यातील 15 कोटी अशा खात्यात ट्रान्सफर झाले आहेत की ज्याच्याशी सुशांतचा काहीही संबध नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याच्या या आरोपामुळे या प्रकरणाला अचानक वेगळी कलाटणी मिळाली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Riya had a quarrel with Sushant's sister, the actress's tension will increase with the new revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.