OMG ! कॅमे-याच्या अँगलने केला घोळ; दीपिका पादुकोणचा दिसला बेबी बम्प!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 10:09 IST2019-05-08T10:04:39+5:302019-05-08T10:09:46+5:30

‘छपाक’ गर्ल दीपिका पादुकोणने यंदाचा ‘मेट गाला’ इव्हेंट गाजवला.  बार्बी लूकमध्ये दीपिका ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. बार्बी लूकमधील डीपीचा अंदाज सगळ्यांनाच भावला. पण याच इव्हेंटदरम्यान दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली.

reports of deepika padukones pregnancy are rumors | OMG ! कॅमे-याच्या अँगलने केला घोळ; दीपिका पादुकोणचा दिसला बेबी बम्प!!

OMG ! कॅमे-याच्या अँगलने केला घोळ; दीपिका पादुकोणचा दिसला बेबी बम्प!!

ठळक मुद्देछपाक चित्रपट १० जानेवारी, २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘छपाक’ गर्ल दीपिका पादुकोणने यंदाचा ‘मेट गाला’ इव्हेंट गाजवला.  बार्बी लूकमध्ये दीपिका ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर उतरली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. बार्बी लूकमधील डीपीचा अंदाज सगळ्यांनाच भावला. पण याच इव्हेंटदरम्यान दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली.
 होय, ‘मेट गाला’च्या आफ्टर पार्टीमध्ये दीपिकासोबत प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी एकत्र असे खूप फोटो क्लिक केलेत. हे फोटो लगेच व्हायरलही झालेत. यातलाच एक फोटो पाहून दीपिका प्रेग्नंट असल्याचा कयास लावला गेला. होय, या फोटोत दीपिकाचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळेच  हा फोटो व्हायरल झाला आणि दीपिका आई होणार, अशी बातमी कानोकानी झाली. अर्थात काहीच तासांत दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा अफवा सिद्ध झाली.

दीपिकाच्या एका जवळच्या व्यक्तिने डीपी प्रेग्नंट असल्याची बातमी फेटाळून लावली. दीपिका प्रेग्नंट असल्याची चर्चा एकदम खोटी आहे. केवळ कॅमेºयाचा अँगल चुकल्यामुळे या फोटोत दीपिकाचा बेबी बम्प दिसला, असे या व्यक्तिने स्पष्ट केले. एकंदर काय, तर कॅमे-याच्या अँगलने सगळा घोळ केला.

दीपिकाने गतवर्षी अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्नगाठ बांधली होती. दीपिकाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर सध्या ती ‘छपाक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘छपाक’ मधून दीपिका पादुकोण निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. यात विक्रांत मेस्सी दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार हा चित्रपट दिग्दर्शित करतेय.

Web Title: reports of deepika padukones pregnancy are rumors