रेणुका शहाणेंचं खरं नाव काय? स्वभावाशी आहे खास संबंध; म्हणाल्या,"माझ्या आज्जीने मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:16 IST2023-05-01T16:15:07+5:302023-05-01T16:16:45+5:30

रेणुका शहाणेंचं खरं नाव भलतंच आहे

renuka shahane real name was different reveals story behind her name | रेणुका शहाणेंचं खरं नाव काय? स्वभावाशी आहे खास संबंध; म्हणाल्या,"माझ्या आज्जीने मला..."

रेणुका शहाणेंचं खरं नाव काय? स्वभावाशी आहे खास संबंध; म्हणाल्या,"माझ्या आज्जीने मला..."

अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हे कलाविश्वातील लोकप्रिय नाव. अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपला जम बसवला आहे. चेहऱ्यावर नेहमी दिलखुलास हसू असणाऱ्या रेणुका शहाणेंनी चित्रपट असो किंवा मालिका सगळ्यात क्षेत्रा ठसा उमटवला आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्या फिल्म इंड्स्ट्रीत कार्यरत आहेत. तर त्यांचे पती आशुतोष राणा आहेत.

रेणुका या नावामागचा किस्सा 

 नुकत्याच एका मुलाखतीत रेणुका शहाणेंनी त्यांच्या स्वभवाचा आणि नावामागचा काय संबंध आहे याचा खुलासा केला. त्या म्हणतात, 'लहानपणी मी खूप आळशी होते.कामाचा कंटाळा होता. अबोलही होते. अनेक नातेवाईकांना वाटायचं मी हसरी आहे पण मठ्ठ आहे. याउलट माझा भाऊ गिरीश हुशार आहे. मला बरेच नातेवाईक उमा म्हणून हाक मारायचे. पण त्यांची आई आणि भाऊ मात्र रेणुकाच म्हणायचे."

त्या पुढे म्हणाल्या," माझ्या वडिलांना राजकारणात गाजलेल्या स्त्रीचंच नाव ठेवायचं होतं. हेलन, रोजा, रेणुका, इंदिरा अशी नावं सुचवली. त्यावर आई म्हणाली मग रेणुकाच. त्यामुळे त्यांचं नाव रेणुका ठेवलं गेलं. पण माझ्या आईच्या आईने मला पाहिलं आणि त्या म्हणाल्या ही किती नाजूक आहे हिला रेणुका नाव शोभत नाही.तिला लहान, सोपं आणि गोड नाव ठेवलं पाहिजे मग त्यांनीच माझं नाव उमा असं ठेवलं."

रेणुका शहाणे यांच्या आईवडिलांचा नंतर घटस्फोट झाला होता. त्यावेळी त्यांना अनेकांनी मोडलेल्या संसारातून आली असं म्हणत हिणवलं होतं. तसंच पुढे रेणुका शहाणे यांचंही पहिलं लग्न मोडलं. म्हणून त्यांचा लग्न या व्यवस्थेवरुन विश्वासच उडाला होता.  मात्र काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात आशुतोष राणा यांची एन्ट्री झाली आणि त्यांचा पुन्हा प्रेमावर विश्वास बसला.

Web Title: renuka shahane real name was different reveals story behind her name