तुमच्याकडे काही काम नाही का म्हणणाऱ्याला रेणुका शहाणेने सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 19:40 IST2019-04-10T19:39:39+5:302019-04-10T19:40:10+5:30
अभिनेत्री रेणुका शहाणे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती आजूबाजूंच्या घडामोडी, राजकीय प्रसंग व इतर मुद्द्यांवर परखडपणे मत मांडत असते.

तुमच्याकडे काही काम नाही का म्हणणाऱ्याला रेणुका शहाणेने सुनावले खडेबोल
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने भुरळ पाडणारी अभिनेत्री रेणुका शहाणे सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती आजूबाजूंच्या घडामोडी, राजकीय प्रसंग व इतर मुद्द्यांवर परखडपणे मत मांडत असते. त्यासाठी अनेकदा तिला ट्रोल केले जाते. तरीदेखील ती आपली मते प्रखरपणे सोशल मीडियावर व्यक्त करते. नुकतेच एका युजरने तुम्हाला काही काम नाही का, असा प्रश्न विचारला. त्यावर रेणुका शहाणेदेखील त्याला खडेबोल सुनावले आहेत.
एका ट्विटर युजरने त्यांना विचारले की ‘रेणुका जी, तुमच्याकडे काही काम नाही का? की आजकाल तुम्ही ट्विटरवर काम करत आहात?.’ त्यावर रेणुका म्हणाली की, ‘का? जे ट्विट करतात त्यांच्याकडे काही काम नसतं असं तुम्हाला वाटत का? आणि जे कोणी ट्विट करतात, मग ते उद्योगपती असो, वैज्ञानिक असो, राजकीय नेता असो किंवा सामान्य व्यक्ती त्यांच्याकडे काही काम नसतं का? ट्विटर अकाऊंट उघडून गप्प बसण्यात काय अर्थ आहे?’
तो उनकी चिंता की आपको क्यूँ इतनी चिंता होने लगी जो विडियो के बारे में बार बार जिक्र कर रहीं हैं आप? 😂😂 https://t.co/uVkP62uXLN
— Renuka Shahane (@renukash) April 10, 2019
😂 क्यूँ ? क्या आप मानते हैं कि जो ट्वीट करते हैं उनके पास काम नहीं? और जो भी ट्वीट करते हैं, बडे उद्योगपति, वैज्ञानिक, राजनैतिक दल, सामान्य लोग, ये इसलिये ट्वीट करते हैं क्योंकि उनके पास कोई काम नहीं है?ट्विटर अकाऊंट खोलके चुप बैठने का क्या मतलब, नहीं? 😂 https://t.co/Ast8hmZ1Mn— Renuka Shahane (@renukash) April 10, 2019
रेणुका शहाणेेचे हे सडेतोड उत्तर नेटकऱ्यांनाही भावले आहे. त्यामुळे काहींनी त्यांचे कौतूकही केले आहे.