रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 03:06 PM2024-05-24T15:06:17+5:302024-05-24T15:06:42+5:30

Rekha: जया भादुरी आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न होण्यापूर्वी जया आणि रेखा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीमध्ये रहायच्या त्यामुळे त्यांचं एकमेकींकडे येणं-जाणं सुरु असायचं.

rekha-used-to-call-didibhai-to-jaya-bhaduri-both-lived-in-same-building-rekha-amitabh-first-meeting | रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी

रेखाने जयाला दिलं होतं खास टोपणनाव; बिग बींची एन्ट्री झाली अन् दुरावल्या दोन जवळच्या मैत्रिणी

बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कोणाची लव्हस्टोरी गाजली असा प्रश्न विचारला तर सहाजिकच कोणीही अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीचं नाव सांगेल. या जोडीचं अफेअर, त्यांचं ब्रेकअप, रेखा-जयामधील वाद इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील ठावूक आहे. एकेकाळी जया बच्चन आणि रेखा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र, रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या गोष्टी जयाच्या कानावर पडल्या आणि त्यांनी रेखासोबत (rekha) असलेली मैत्री कायमची तोडली. यामध्येच एकेकाळी रेखा, जयाला कोणत्या टोपणनावाने हाक मारायची हे जाणून घेऊयात.

जया भादुरी (jaya bhaduri) आणि अमिताभ बच्चन यांचं लग्न होण्यापूर्वी जया आणि रेखा एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघीही एकाच इमारतीमध्ये रहायच्या त्यामुळे त्यांचं एकमेकींकडे येणं-जाणं सुरु असायचं. इतकंच नाही तर त्या दोघीही एकमेकींच्या आयुष्यातील वा प्रोफेशनल लाइफविषयी सुद्धा एकमेकींविषयी चर्चा करायच्या. याविषयी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात याविषयी उल्लेख करण्यात आला आहे. 

रेखाने दिलं होतं जयाला टोपणनाव

रेखा आणि जया यांच्या मैत्रीचा उल्लेख यासर उस्मान यांनी रेखाच्या आत्मचरित्रामध्ये केला आहे. रेखा यांनी १९७२ मध्ये मुंबईमध्ये स्वत:चा फ्लॅट विकत घेतला होता. त्यापूर्वी त्या हॉटेल अजिंठामध्ये रहायच्या. परंतु, नवा फ्लॅट घेतल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी त्या जुहू बीच अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाल्या. याच इमारतीमध्ये जया भादुरी रहात होत्या. त्यावेळी जया इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. एकाच इमारतीमध्ये रहात असल्यामुळे या दोघींची वरचेवर भेट व्हायची. त्यामुळे त्यांच्या मैत्री झाली. त्यामुळे रेखा जया यांना प्रेमाने 'दीदीभाई' या टोपणनावाने हाक मारायची.

जयामुळे झाली रेखा- अमिताभची ओळख

'टाइम्स ऑफ इंडिया'ने या पुस्तकाचा संदर्भ देत जयामुळे रेखा-अमिताभची भेट झाल्याचं म्हटलं आहे. अमिताभ बच्चन जयाला भेटण्यासाठी तिच्या घरी यायचे. त्याचवेळी बिग बी आणि रेखाची पहिली भेट झाली होती. त्यामुळे या तिघांचीही चांगली गट्टी जमली. ते तिघेही लाँग ड्राइव्हला जायचे.

Web Title: rekha-used-to-call-didibhai-to-jaya-bhaduri-both-lived-in-same-building-rekha-amitabh-first-meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.