भर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं इग्नोर, अभिषेक पाहताच मारली मिठी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:41 IST2025-03-05T18:41:30+5:302025-03-05T18:41:51+5:30

रेखा आणि अक्षय यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

Rekha Ignored Akshay Kumar Hugged Abhishek Bachchan Video Viral | भर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं इग्नोर, अभिषेक पाहताच मारली मिठी, Video व्हायरल

भर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं इग्नोर, अभिषेक पाहताच मारली मिठी, Video व्हायरल

Rekha Akshay Kumar Video: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार ( Akshay Kumar) आपल्या मेहनतीच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक मोठा चेहरा आहे. अक्षयने  २००१ साली अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्यासोबत विवाह केला, पण त्याआधी त्याचं नाव अनेक सहकलाकारांसोबत जोडलं गेलं होतं. अक्षयच्या अफेअर्सची यादी मोठी आहे. अक्षयचे मॉडेल आणि अभिनेत्री पूजा बत्रा, रवीना टंडन, शिल्पा शेट्टीपासून प्रियंका चोप्रा आणि रेखासोबत अफेअरचे किस्से गाजले आहेत. अभिनेत्री रेखा आणि अक्षय यांच्या नात्यावरून तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता. आता नुकतंच रेखा आणि अक्षय यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

काल ३ मार्च रोजी मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये काही कलाकार पोहोचले होते. यावेळी रेखा आणि अक्षयही त्याच ठिकाणी आले होते. सर्वजम व्हाईट आऊटफिटमध्ये होते. रेखा यांनी पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. त्यावर गॉगल अशा लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. तर अक्षय हा व्हाईट सूटमध्ये डॅशिंग दिसत होता. रेखा या स्टेजवर उभ्या होत्या, तेव्हा अक्षय आणि क्रिकेटपटू शिखर धवन एकापाठोपाठ स्टेजकडे येतात. अक्षय आधी स्टेजवर पोहचतो. पण, रेखा या अक्षयकडे दुर्लक्ष करतात. एवढंच काय तर त्या अक्षयकडे पाहतही नाहीत आणि मागून येणाऱ्या शिखरच्या दिशेनं हात पुढे करतात.


अक्षय आणि शिखरनंतर अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan) हा स्टेजवर येतो. तर अभिषेकला पाहताच रेखा त्याला मिठी मारतात.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रेखा यांनी अक्षय याच्याकडे का दुर्लक्ष केलं, अशा कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओवर केल्या आहेत.  रेखा आणि अक्षय यांनी 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी रेखाला अक्षय आवडू लागला असल्याच्या बातम्या लमोर आल्या होत्या. आता बऱ्याच वर्षांनी जेव्हा ते दोघे एकत्र आले, तेव्हा रेखा यांनी अक्षयला जराही भाव दिला नाही. 

Web Title: Rekha Ignored Akshay Kumar Hugged Abhishek Bachchan Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.