पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:13 IST2025-09-04T15:12:45+5:302025-09-04T15:13:26+5:30
एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ते लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं. पण, त्याचं लग्न होऊ शकलं नाही.

पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे रेखा. ७० वर्षांची रेखा आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. बॉलिवूडमधील यशस्वी करिअरसोबतच रेखा तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत होती. तिच्या लव्ह लाइफची प्रचंड चर्चा रंगली. काही अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. ते लग्न करणार असल्याचंही बोललं जात होतं. पण, त्याचं लग्न होऊ शकलं नाही.
८०च्या दशकात रेखा आणि पाकिस्तान क्रिकेटर इमरान खान यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या दोघांनीही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. मीडिया रिपोर्टनुसार, ते दोघे लग्न करणार होते. रेखाच्या आईलाही त्यांची जोडी पसंत होती. एवढंच काय रेखाच्या आईने ज्योतिषाला दोघांच्या पत्रिकाही दाखवल्या होत्या. ते दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट मॅच असल्याचं ज्योतिषाने सांगितलं होतं.
रेखा आणि इमरान खान लग्न करणार होते. अभिनेत्रीच्या आईनेही याला मंजुरी दिली होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही आणि ते एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या ब्रेकअपच नेमकं कारण कोणालाच माहिती नाही. पण, बॉलिवूडमधल्या चर्चेतल्या अफेअर्समध्ये रेखा आणि इमरान खान यांचं नाव कायम घेतलं जातं.