अक्षय कुमारच्या प्रेमात पडल्यानंतर सेटवर रेखा करायच्या हे काम, रवीना टंडन म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:09 IST2024-03-05T16:08:26+5:302024-03-05T16:09:05+5:30
Rekha And Akshay Kumar : एक काळ असा होता जेव्हा रेखा आणि अक्षयचे नावे जोडले गेले होते. रेखा त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या अक्षयच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी अक्षय कुमार रवीना टंडनसोबत रिलेशनशीपमध्ये होता.

अक्षय कुमारच्या प्रेमात पडल्यानंतर सेटवर रेखा करायच्या हे काम, रवीना टंडन म्हणाली...
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार(Akshay Kumar)चे नाव इंडस्ट्रीतील अनेक नायिकांशी जोडले गेले आहे. तथापि, या यादीत एक नाव आहे जे तुम्हाला चकित करेल. ते नाव आहे ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Rekha). होय, एक काळ असा होता जेव्हा रेखा आणि अक्षयचे नावे जोडले गेले होते. रेखा त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या अक्षयच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी अक्षय कुमाररवीना टंडनसोबत रिलेशनशीपमध्ये होता.
ही गोष्ट आहे १९९६ सालची, जेव्हा अक्षय कुमार, रेखा आणि रवीना टंडन यांचा खिलाडी का खिलाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय आणि रेखा यांचे अनेक इंटिमेट सीन्स होते, जे चर्चेत आले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेखा यांचा अक्षयकडे असलेला कल दिसून आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा अक्षयला पसंत करू लागल्या होत्या. त्या अक्षयसाठी घरून जेवणही आणायच्या. त्यावेळी अक्षय आणि रवीना एकमेकांना डेट करत होते. ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात रवीना आणि अक्षय एंगेजमेंट झाली, परंतु त्यांचे नाते टिकले नाही आणि रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केले.
रवीना म्हणाली होती...
सिनेबिट्सला दिलेल्या मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली होती की, "त्यावेळी, जर त्या अभिनेत्रीला माहित होते की आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत आणि त्या अजूनही अक्षयच्या जवळ येत होत्या, तर मी गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत होती. मी ते पाहिले होते. त्या त्याच्यासाठी घरून जेवण आणायच्या. पण अक्षयला परिस्थिती कशी हाताळायची हे माहीत होतं."