'अर्जुन रेड्डी' चित्रपटासाठी 'हे' गाणे केले रिक्रिएट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 17:46 IST2018-09-27T17:43:09+5:302018-09-27T17:46:02+5:30
प्रभूदेवा व नगमा यांच्यावर चित्रीत झालेले लोकप्रिय गाणे उर्वशी शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांचा आगामी सिनेमा 'अर्जुन रेड्डी'साठी रिक्रिएट करण्यात आले आहे.

'अर्जुन रेड्डी' चित्रपटासाठी 'हे' गाणे केले रिक्रिएट
अभिनेता शाहिद कपूरचा नुकताच 'बत्ती गुल मीटर' चालू हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. लवकरच शाहिद आगामी अर्जुन रेड्डी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. हा चित्रपट तेलगू सिनेमा 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र आता तिच्या जागी कियारा आडवाणीची वर्णी लागली आहे.
'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमधील उर्वशी गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे प्रभूदेवा व नगमा यांच्यावर चित्रीत झालेले लोकप्रिय गाणे उर्वशी रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यात हनी सिंगची जादूदेखील अनुभवायला मिळणार आहे. या गाण्याचा टीझर शाहिदने ट्विटरवर शेअर केला आहे.
Take it easy #Urvashi@Advani_Kiara@asliyoyo@itsBhushanKumar@directorgifty@TSeries@Hungama_compic.twitter.com/dXkY1bKDl1
— Shahid Kapoor (@shahidkapoor) September 26, 2018
'अर्जुन रेड्डी' चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये 'स्टुंडट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता तिच्याजागी अभिनेत्री कियारा आडवाणीची वर्णी लागली आहे. कियारा सध्या दाक्षिणात्य अभिनेता रामचरणसोबत आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. 'अर्जुन रेड्डी' या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन संदीप वोंगा करणार आहेत. या सिनेमाची निर्मिती टी सीरिजचे भूषण कुमार व क्रिष्णा कुमार करणार आहे. शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रसिकांना भुरळ पाडेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.