'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 06:20 PM2018-09-25T18:20:10+5:302018-09-25T18:42:59+5:30

अभिनेता शाहिद कपूरचा नुकताच 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यात आता त्याने आपल्या आगामी चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मधील नायिकेची घोषणा केली आहे. 

This Actress will be seen in 'Arjun Reddy's Hindi remake' with Shahid Kapoor | 'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री

'अर्जुन रेड्डी'च्या हिंदी रिमेकमध्ये शाहिद कपूर सोबत झळकणार ही अभिनेत्री

googlenewsNext
ठळक मुद्देशाहिद कपूर व कियारा आडवणी झळकणार एकत्रतेलगू अर्जुन रेड्डी चित्रपटाचा येणार हिंदी रिमेक

 

अभिनेता शाहिद कपूरचा नुकताच 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यात आता त्याने आपल्या आगामी चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मधील नायिकेची घोषणा केली आहे. 

शाहिदने ट्विटरवर सांगितले आहे की 'या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.' कियारा या सिनेमात प्रीतीची भूमिका करणार आहे. तेलगू चित्रपट अर्जुन रेड्डी सुपरहिट ठरला होता. यात विजय देवारकोंडा व शालिनी पांडे मुख्य भूमिकेत होते. 

'अर्जुन रेड्डी' चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये 'स्टुंडट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता तिच्याजागी अभिनेत्री कियारा आडवाणीची वर्णी लागली आहे. कियारा सध्या दाक्षिणात्य अभिनेता रामचरणसोबत आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.

'अर्जुन रेड्डी' चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी कियारा आडवाणी निर्मात्यांची पहिली पसंती होती. संदीप वोंगा आणि कियारा या प्रोजेक्टसाठी भेटलेदेखील होती. त्यावेळी या सिनेमाच्या चित्रीकरणाला ऑगस्टमध्ये सुरूवात होणार होती. मात्र त्यावेळी कियाराच्या शूटिंगच्या तारखा मिळत नव्हत्या. त्यानंतर या सिनेमाचे चित्रीकरण ऑक्टोबरमध्ये गेले. त्यामुळे कियाराने हा चित्रपट साइन केला आहे आणि तिने संदीप वोंगा यांच्याबरोबर सिनेमाच्या चर्चेला सुरूवात केली आहे.

या चित्रपटाबाबत कियारा म्हणाली की, ''अर्जुन रेड्डी' मधील माझी भूमिका चॅलेजिंग अाहे. तेलगू अर्जुन रेड्डी चित्रपट मला खूप आवडतो. यात नायिकेच्या बऱ्याच शेड आहेl. ही भूमिका करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ''अर्जुन रेड्डी' या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन संदीप वोंगा करणार आहेत. या सिनेमाची निर्मिती टी सीरिजचे भूषण कुमार व क्रिष्णा कुमार करणार आहे.  शाहिद कपूर व कियारा आडवाणी यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रसिकांना भुरळ पाडेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 

Web Title: This Actress will be seen in 'Arjun Reddy's Hindi remake' with Shahid Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.