160 पान खाऊन बजावली 'लापता लेडीज'मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका, रवी किशनचा खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:54 IST2024-12-20T13:53:41+5:302024-12-20T13:54:01+5:30
लापता लेडीजमध्ये रवी किशनचे पात्र पोलिस अधिकारी 'मनोहर' हे पान खाताना दाखवण्यात आले होते.

160 पान खाऊन बजावली 'लापता लेडीज'मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका, रवी किशनचा खुलासा!
Ravi Kishan : रवी किशन हे कलाविश्वातील मोठं नाव आहे. सिनेसृष्टी ते राजकिय क्षेत्र अशी मजलही त्यांनी मारली आहे. भोजुपरीबरोबरच त्यांनी अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांतही काम केलं आहे. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. सध्या रवी किशन 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमात त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तुम्हाला माहितेय पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना रवी किशन यांनी तब्बल 160 पान खाल्ली होती.
रवी किशन हे सिनेमातील पात्र साकारताना पुर्ण जीव त्यात ओततात. पडद्यावर ते पात्र उठून दिसावं यासाठी त्याचा प्रयत्न असतो. रवी किशन हे 'लापता लेडीज' सिनेमात 'मनोहर' या पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत होते. थोडीशी गडद असलेली ही पोलिसाची भूमिका त्यांनी अगदी चोखपणे साकारली. लापता लेडीजमध्ये रवी किशनचे पात्र पोलिस अधिकारी 'मनोहर' हे पान खाताना दाखवण्यात आले होते. या पात्राचं शूट करताना रवी किशन यांना भरपूर पानं खावी लागली. संपुर्ण चित्रपटादरम्यान त्यांना तब्बल १६० पान खावे लागले होते. खुद्द रवी किशनने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, 'मनोहर' हे पोलिस अधिकाऱ्याचं पात्र सतत पान चघळणारं असेल ही कल्पनादेखील रवी किशन यांची होती. रवी किशन म्हणाले, "एकदा आम्ही बिहारला गेलो होतो, तेव्हा मला असाच अधिकारी दिसला होता. मी समोसे खात राहावे अशी किरण रावची इच्छा होती. पण, त्यांना पान ऑर्डर करण्यास सांगितलं. संपुर्ण सिनेमा शुटिंगदरम्यान मी 160 पान खाल्ले होते".
दरम्यान, जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'लापता लेडीज'चं दिग्दर्शन किरण रावने केलं आहे. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला गेला. ज्याची स्क्रिप्ट बिप्लब गोस्वामी यांच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद स्नेहा देसाई यांनी लिहिले. दिव्यानिदी शर्मा यांनीही अनेक संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट १ मार्च २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. सिनेमाला ऑस्कर २०२५ साठीही पाठवण्यात आलं होतं. पण, तो शॉर्टलिस्ट झाला नाही.