'कोणी छत्री द्या यार...' मुंबईच्या पावसात रविना टंडनची लेक वैतागली, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:14 IST2023-07-24T12:13:23+5:302023-07-24T12:14:09+5:30

पापाराझींची गर्दी आणि मुंबईचा पाऊस यामुळे राशाला चांगल्याच त्रासाला सामोरं जावं लागलं.

raveena tondon daughter rasha thadani stressed out in mumbai rain video viral | 'कोणी छत्री द्या यार...' मुंबईच्या पावसात रविना टंडनची लेक वैतागली, Video व्हायरल

'कोणी छत्री द्या यार...' मुंबईच्या पावसात रविना टंडनची लेक वैतागली, Video व्हायरल

सध्या बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिड्सची चलती आहे. अनेक स्टारकिड्स प्रसिद्धीआधीच भाव खाऊन जात आहेत. काही स्टारकिड्सने सिनेमात एंट्रीही घेतली आहे. तर काही अजून शिक्षण पूर्ण करत आहेत. दरम्यान अभिनेत्री रविना टंडनची (Raveena Tondon) लेक राशा थडानीही (Rasha Thadani) सौंदर्याबाबतीत आईलाही टक्कर देत आहे. पापाराझीही राशा झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी तिला फॉलो करत आहेत.

राशा थडानी रविना टंडनची मुलगी आहे. नुकतीच राशा ग्रॅज्युएट झाली असून तिच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता राशाचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आहे. काल रात्री राशा पार्टीसाठी वरळीतील एका हॉटेलबाहेर पोहोचली. तेव्हा प्रचंड वारा आणि पावसामुळे राशा परेशान झाली. 'अरे छत्री नाहीए यार...' असं ती वैतागून ओरडली. पापाराझींची गर्दी आणि मुंबईचा पाऊस यामुळे राशाला चांगल्याच त्रासाला सामोरं जावं लागलं. यावेळी राशाने निळ्या रंगाचा स्कीन टाईट शॉर्ट वनपीस घातला होता. 

राशाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, 'सौंदर्याबाबतीत तर ही आपल्या आईलाही टक्कर देत आहे','सगळ्या स्टारकिड्समध्ये मला राशाच सुंदर वाटते,'कोणी हिला छत्री द्या यार' अशा अनेक कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत.

Web Title: raveena tondon daughter rasha thadani stressed out in mumbai rain video viral