अक्षय कुमारसोबत रवीना टंडन करणार होती लग्न, एका पार्टीत घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे झाले ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 19:24 IST2021-04-17T19:24:10+5:302021-04-17T19:24:37+5:30
अक्षय कुमार आणि रवीना टंडन एकेकाळी सीरियस रिलेशनशीपमध्ये होते.

अक्षय कुमारसोबत रवीना टंडन करणार होती लग्न, एका पार्टीत घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे झाले ब्रेकअप
अभिनेता अक्षय कुमार आज बॉलिवूडमधील सर्वात महागडा कलाकार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार एका चित्रपटासाठी जवळपास १२० कोटी रुपये मानधन घेतो. अक्षय कुमार फक्त प्रोफेशनल लाइफच नाही तर खासगी लाइफमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारचे नाव रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबत जोडले गेले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडन एकेकाळी सीरियस रिलेशनशीपमध्ये होते. असे सांगितले जात होते की दोघांनी साखरपुडादेखील केला होता. अक्षय कुमारचे म्हणणे होते की, रवीनाने लग्नानंतर चित्रपटात काम करायचे नाही आणि असेही सांगितले जाते की अक्षयच्या प्रेमात रवीना आकंठ बुडाली होती. त्यामुळे तिने अक्षय म्हणणे मान्यदेखील केले. मात्र अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्या दोघांच्या नात्यात कटुता आली होती.
असेही रवीनासोबत सीरियस रिलेशनशीपमध्ये असतानाही अक्षय आणि रेखा यांच्यात जवळीकता वाढू लागली होती. खरेतर अक्षय, रवीना आणि रेखाने खिलाडियों के खिलाडी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान अक्षय कुमार आणि रेखा यांच्यात जवळीकता वाढू लागली होती.
एकदा रवीनाने उशीरा रात्री एका पार्टीत अक्षय आणि रेखाला एकत्र पाहिले होते. त्यानंतर रवीनाने अक्षयसोबत ब्रेकअप केले होते.