रवीना टंडनने नाकारला होता शाहरुख खानचा 'हा' सुपरहिट सिनेमा, कंफर्टेबल नसल्याचं दिलेलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:53 IST2025-11-06T10:52:32+5:302025-11-06T10:53:05+5:30
"हा सिनेमा अश्लील नव्हता पण त्यात...", रवीना टंडनने सांगितलं कारण

रवीना टंडनने नाकारला होता शाहरुख खानचा 'हा' सुपरहिट सिनेमा, कंफर्टेबल नसल्याचं दिलेलं कारण
रवीना टंडन एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री. सौंदर्य, अभिनय, नृत्य अशा सगळ्याच बाबतीत ती अग्रेसर होती. अजय देवगण, गोविंदा, सलमान खान, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांच्यासोबतचे तिचे सिनेमे तुफान गाजले. दरम्यान रवीनाला शाहरुख खानचा एक सुपरहिट सिनेमा ऑफर झाला होता ज्याला तिने नकार दिला होता. रवीनाने नुकताच हा खुलासा केला. कोणता आहे तो सिनेमा आणि काय आहे नकाराचं कारण? वाचा
एएनआशी बोलताना रवीना टंडन म्हणाले, "डर हा सिनेमा आधी माझ्याकडे आला होता. पण मी या सिनेमात काम करण्यासाठी कंफर्टेबल नव्हते. हा अश्लील सिनेमा आहे असं मी म्हणणार नाही पण यातले काही सीन्स असे होते ज्यात मी करु शकणार नव्हते. विशेषत: स्वीमसूटचा सीन. मी यासाठी स्पष्ट नकार दिला होता. म्हणूनच मी यश चोप्रा यांचा हा कल्ट मूव्ही नाकारला. नंतर किरणची भूमिका जूही चावलाला ऑफर झाली."
'डर' सिनेमा शाहरुख आणि सनी देओलच्या मतभेदांमुळेही चर्चेत होता. सिनेमात आपली भूमिका साईडलाईन केल्याचा आणि शाहरुखला जास्त फुटेज दिल्याचा आरोप सनीने मेकर्सवर लावला होता. सनीने सिनेमा साईन केला तेव्हा त्याला हे कळवण्यात आलंच नव्हतं की त्याची भूमिका सेकंड लीडची आहे. यावरुन बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली. यानंतर सनी देओल आणि शाहरुख कधीच एकमेकांशी बोलले नाहीत. तसंच सनीने यश चोप्रांसोबतही नंतर परत काम केलं नाही. अनेक वर्षांनी नुकतंच 'गदर २'च्या सक्सेस पार्टीत सनी देओल आणि शाहरुख पुन्हा एकत्र आले.