रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात झळकली 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री, दीपिकाबरोबर केली स्क्रीन शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 12:48 IST2024-11-05T12:47:12+5:302024-11-05T12:48:19+5:30

'सिंघम अगेन'मध्ये जशी बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. तसंच अनेक नवे मराठी चेहरेही झळकले आहेत. 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीचीही रोहित शेट्टीच्या सिनेमात वर्णी लागली आहे. 

ratris khel chale 3 fame actress bhagya nair debut in bollywood with singham again shared screen with deepika padukone | रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात झळकली 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री, दीपिकाबरोबर केली स्क्रीन शेअर

रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात झळकली 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री, दीपिकाबरोबर केली स्क्रीन शेअर

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'सिंघम अगेन' सिनेमा अखेर दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. सिंघम ३ नंतर या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता होती. रोहित शेट्टीने 'सिंघम अगेन' सिनेमातून पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर अॅक्शनचा धमाका केला. या सिनेमातून रोहितने अख्खं बॉलिवूडच मोठ्या पडद्यावर उतरवलं. अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या रोहित शेट्टीच्या सिनेमात एक मराठी अभिनेत्रीही झळकली आहे. 

रोहित शेट्टी आणि मराठी कलाकार हे जुनं समीकरण आहे. रोहित शेट्टीच्या असा एकही सिनेमा सापडणार नाही ज्यात मराठी कलाकार नाहीत. त्यामुळेच 'सिंघम अगेन'मध्ये जशी बॉलिवूड कलाकारांची फौज आहे. तसंच अनेक नवे मराठी चेहरेही झळकले आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये अभिनेता अंकित मोहनने भूमिका साकारली आहे. तर 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीचीही रोहित शेट्टीच्या सिनेमात वर्णी लागली आहे. 

'सिंघम अगेन'मध्ये झळकणारी ही अभिनेत्री म्हणजे भाग्या नायर आहे. रोहित शेट्टीच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे भाग्याचं नशीबच उजळलं आहे. 'सिंघम अगेन'मधून भाग्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमात तिची भूमिका छोटीशी असली तरी भाग्या भाव खाऊन जाते. रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' सिनेमात भाग्याने दीपिका पादुकोणबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. 


रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ४३.५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी ४२.५ कोटींची कमाई केली. रविवारी सिनेमाने ३५.७५ कोटी कमावले. पण सोमवारी मात्र सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसत आहे. आत्तापर्यंत 'सिंघम अगेन' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३९ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: ratris khel chale 3 fame actress bhagya nair debut in bollywood with singham again shared screen with deepika padukone