‘RRR’ हा सिनेमा म्हणजे...! रत्ना पाठक यांना आवडला नाही राजमौलींचा सिनेमा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 17:48 IST2022-12-19T17:48:31+5:302022-12-19T17:48:42+5:30
Ratna Pathak Shah On RRR: ‘आरआरआर’वर केलेलं रत्ना पाठक यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे आणि यावरून रत्ना पाठक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.

‘RRR’ हा सिनेमा म्हणजे...! रत्ना पाठक यांना आवडला नाही राजमौलींचा सिनेमा!!
Ratna Pathak Shah On RRR: एस एस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमानं लोकांना अक्षरश: वेड लावलं. जगभरात या सिनेमानं अक्षरश: धुमाकूळ घालत तब्बल 1200 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक यांना मात्र हा सिनेमा प्रतिगामी विचारांचा वाटला. ‘आरआरआर’वर केलेलं त्यांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे आणि यावरून रत्ना पाठक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत.
एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना रत्ना पाठक ‘आरआरआर’बद्दल बोलल्या.
काय म्हणाल्या रत्ना पाठक?
‘आरआरआर’सारखे चित्रपट आजकाल लोकप्रिय होतात. पण हा चित्रपट फारच ‘रिग्रेसिव्ह’ (प्रतिगामी विचारांचा) आहे. हा सिनेमा आपल्याला मागे बघायला लावतो, जेव्हा की आपण पुढे पाहायला हवं. जोवर दिग्दर्शक स्वत:च्या कलाकृतीकडे समीक्षकाच्या नजरेतून पाहत नाही तोवर आरआरआर सारखेच चित्रपट आपल्याला बघावे लागतील. पण आपल्याला टीका आवडत नाही. टीकेमुळे आपला अहंकार दुखावतो. अनेकांनी ही वातावरण निर्मिती केली आणि दुर्दैवाने आपण सगळ्यांनी हे स्वीकारलं,’असं रत्ना पाठक म्हणाल्या. रत्नी पाठक यांच्या या वक्तव्यानंतर त्या ट्रोलर्सच्या निशण्यावर आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
रत्ना पाठक यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच गुजराती चित्रपटात पदार्पण करणार आहेत. त्यांचा ‘कच्छ एक्सप्रेस’ येत्या 6 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याचं दिग्दर्शन विरल शाह यांनी केलं आहे.