'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:17 IST2025-12-05T15:08:58+5:302025-12-05T15:17:45+5:30
'ॲनिमल'मध्ये महिलांना कमी लेखलं गेलं, मग 'मिर्झापूर'चं काय; नेटकरी अभिनेत्रीवर भडकले

'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी सिनेमाची प्रचंड स्तुती केली तर काहीं जणांनी सिनेमावर टीका केली. सिनेमात महिलांना ज्याप्रकारे दाखवण्यात आलं ते अत्यंत वाईट होतं. शिवाय सिनेमात अतिशय क्रूर हिंसा दाखवणारे सीन्स होते. 'मिर्झापूर'सीरिजमध्ये पंकज त्रिपाठींच्या बायकोच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री रसिका दुग्गलने 'ॲनिमल' सिनेमाबाबत झालेल्या वादाचं कारण सांगितलं. तिने सिनेमात मिसॉजिनी दाखवण्यात आल्याचं वक्तव्य केलं. यावर आता नेटकरी भडकले आहेत.
'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूर अल्फा मेल दाखवण्यात आला. 'द वुमन एशइया इव्हेंट'मध्ये अभिनेत्री रसिका दुग्गलने 'ॲनिमल'सिनेमावर मत व्यक्त केलं. ती म्हणाली, " मला जे काम करायची इच्छा आहे ते काम देणाऱ्या संधी मला मिळत गेल्या तर मी नक्कीच करेन. आता ते नक्की किती प्रमाणात करायचं आहे हे मी ठरवेन. दुसरं म्हणजे मिसॉजिनी दाखवणारे आणि प्रॉपगंडा असणारे सिनेमे मी कधीच करणार नाही. माझ्या या मतावर मी अढळ आहे. यामुळेच मी 'ॲनिमल' सारखा सिनेमाही केला नसता. मला अशा भूमिका करायला आवडतील ज्या माझ्या खऱ्या आयुष्याशी निगडित नसतील. ज्यात कलाकार म्हणून अभिनयाचा कस लागेल अशा गोष्टी करायला मला नक्कीच आवडतील. पण प्रोजेक्टचं पॉलिटिक्स नक्की काय आहे हे पाहणंही माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे."
रसिकाच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 'हिनेच मिर्झापूर केलं ना? त्याला काय फेमिनिस्ट मास्टरपीस म्हणायचं का?','खरंच ही हे बोलतेय? मिर्झापूरमध्ये तिचं कॅरेक्टर काय होतं सगळ्यांनी पाहिलं आणि तरी ती ॲनिमलवर बोलतेय?','दुटप्पीपणाचं सर्वात चांगलं उदाहरण' अशा कमेंट्स आल्या आहेत.