रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:36 IST2023-04-07T12:35:25+5:302023-04-07T12:36:57+5:30

नुकताच रश्मिकाने 27 वा वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.

rashmika mandanna vijay deverkonda lives in the same house actress gives epic reply on rumous | रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि 'चॉकलेट बॉय' विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. काही महिन्यांपूर्वीच दोघे मालदीव्ह्जला एकत्र गेल्याचा संशय चाहत्यांना आला होता. नुकताच रश्मिकाने 27 वा वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. मात्र या व्हिडिओनंतर चाहत्यांनी अंदाजा लावला की रश्मिका आणि विजयने एकत्रच वाढदिवस साजरा केला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

त्याचं झालं असं की रश्मिकाने वाढदिवसाला ज्याठिकाणाहून व्हिडिओ पोस्ट केला त्याच ठिकाणी विजयनेही याआधी एकदा व्हिडिओ पोस्ट केला होता. दोघांच्या चाहत्यांनी तसे स्क्रीनशॉटच सोशल मीडियावर व्हायरल केले. हेच बघून चाहत्यांनी चर्चा सुरु केली की हे दोघंही एकाच घरात राहतात आणि दोघांनी एकत्रच रश्मिकाचा वाढदिवस साजरा केला आहे.

व्हायरल झालेल्या या पोस्टवर रश्मिकाने मजेशीर कमेंट केली आहे. रश्मिकाने लिहिले,'अय्यो..जास्त विचार नको करु बाबू.'

हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. याआधीही दोघांची अशीच पोलखोल झाली आहे. मालदीव्ह्जच्या दोघांच्या फोटोत एकच बॅकग्राऊंड दिसत असल्याचं चाहत्यांचं लक्षात आलं होतं. तेही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विजय आणि रश्मिकाने अद्याप नात्याबद्दल अधिककृत खुलासा केलेला नाही. मात्र त्यांच्यातील मैत्री आणि प्रेम हे काही जगापासून लपून राहिलेलं नाही.

रश्मिकाने 'गुडबाय' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये ती बिग बींसोबत झळकली. तर आता ती रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' या सिनेमातही दिसणार आहे. सध्या सिनेमाचे शूट सुरु आहे.

Web Title: rashmika mandanna vijay deverkonda lives in the same house actress gives epic reply on rumous