रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, "तो सर्वात मोठा सुपरस्टार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:08 IST2024-12-12T15:08:10+5:302024-12-12T15:08:36+5:30
रश्मिकाने सांगितला त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव

रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, "तो सर्वात मोठा सुपरस्टार..."
'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाचं (Rashmika Mandanna) करिअर सध्या जोरात सुरु आहे. एकामागोमाग एक सिनेमात तिची वर्णी लागत आहे. 'अॅनिमल' आणि आता 'पुष्पा 2' च्या यशानंतर रश्मिकाचे आणखीही सिनेमे प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. विकी कौशलसोबतचा 'छावा' तर सलमान खानसोबतचा (Salman Khan) 'सिकंदर' हे दोन्ही तिचे आगामी प्रदर्शित होणारे हिंदी सिनेमे आहेत. दरम्यान रश्मिकाने नुकतंच 'सिकंदर' मध्ये सलमानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.्
रश्मिका मंदाना सध्या 'पुष्पा २' चं यश एन्जॉय करत आहे. त्यातच तिचा साऊथमधील सिनेमा 'द गर्लफ्रेंड'चा टीझर आला आहे. यामुळे रश्मिका बॉलिवूड आणि साऊथ दोन्ही इंडस्ट्री गाजवत आहे. त्यातच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली असल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत 'सिकंदर'चा अनुभव सांगताना रश्मिका म्हणाली, "सलमान खानसोबत काम करणं हे माझ्यासाठी स्वप्न सत्यात उतरणं आहे. तो खरोखरंच या देशातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे. पण तो तितकाच डाऊन टू अर्थ आहे याच कोणाचंच दुमत नसणार. शूटिंगदरम्यान एक दिवस माझी तब्येत बरी नव्हती. हे सलमानला कळल्यावर त्याने माझी काळजी घेतली. क्रूला सांगून माझ्यासाठी हेल्दी फूड, कोमट पाणी मागवलं. माझी विचारपूस केली. त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते. त्याचा मजेशीर अंदाज भावतो. मी सिकंदर सिनेमासाठी खूप आतुर आहे. माझ्यासाठी हा सर्वात खास सिनेमा आहे आणि तुमच्यासारखीच मीही या सिनेमाच्या रिलीजची वाट पाहू शकत नाही."
तर 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका म्हणाली, "सिकंदर हा माझा पहिला व्यावसायिक बॉलिवूड सिनेमा आहे. म्हणजे आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये मी परफॉर्म केलं आहे. पण सिकंदर मध्ये मी एक टिपिकल हिरोईन आहे. त्यांमुळे चाहत्यांनो आतापर्यंत तुम्ही मला पाहिलं त्यापेक्षा यात माझी भूमिका वेगळी असणार आहे. कृपया हा सिनेमा पाहताना असंच त्याला मजेत घ्या."
'सिकंदर' पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. ए.आर.मुरुगदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री काजल अग्रवालचीही सिनेमात भूमिका आहे.