'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:36 IST2025-10-17T16:35:04+5:302025-10-17T16:36:30+5:30
रश्मिका मंदानाने 'थामा' सिनेमावर केलं भाष्य

'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
अभिनेत्री रश्मिका मंदाना आगामी 'थामा' सिनेमात दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर जगात रश्मिकाची एन्ट्री झाली आहे. 'थामा'मध्ये रश्मिकासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. ही व्हॅम्पायर्सची कहाणी असणार आहे. रश्मिकाने सिनेमात दमदार अॅक्शन सीन्स दिले आहेत. याबद्दल नुकतंच तिने एका मुलाखतीत भाष्य केलं.
'थामा'च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, "मला वाटतं थामा मधून मी पहिल्यांदाच अॅक्शन करत आहे. याआधी मी एकाच प्रकारचा अभिनय करत होते. थामाने माझ्यासाठी अॅक्शनचे दरवाजे खुले केले आहेत. मी मायसा नावाचाही एक सिनेमा करत आहे ज्यात भरपूर अॅक्शन दृश्य आहेत. या सिनेमासाठी शारिरीकदृष्ट्या बरेच कष्ट घ्यावे लागले. म्हणूनच दोन्ही सिनेमांमध्ये मी फरक पाहत आहे. पण थामामध्ये थोड्या अॅक्शनमधून मी अख्खं जग एकत्र आणू शकते हे केबल वर्क मला खूप आवडलं."
ती पुढे म्हणाली, "माझ्यासाठी ही नवीनच कन्सेप्ट आहे. यासाठी खूप मेहनतीची गरज आहे. खरं सांगायचं तर मला माझ्या या भूमिकेबद्दल काहीच आयडिया नव्हती. माझ्यासाठी हा प्रवास रोमांचक राहिला आहे. काहीही माहित नसताना मी हे केलंय. एक कलाकार म्हणून मी सेटवर जाते आणि दिग्दर्शक, संपूर्ण कास्ट आणि क्रूसमोर समर्पित होते. तेही मला सहकार्य करतात आणि पुढे घेऊन जातात."
'थामा' दिवाळीच्या मुहुर्तावर २१ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीचीही भूमिका आहे. चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता आहे.