Rahsmika Mandannaच्या बॉडीगार्डने सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनला दिला धक्का, व्हिडीओ पाहून भडकले लोक, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:07 IST2023-05-18T15:03:18+5:302023-05-18T15:07:50+5:30
रश्मिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तिच्या बॉडीगार्डवरचं वागणं पाहून नेटिजन्स यूजर्स भडकले आहेत.

Rahsmika Mandannaच्या बॉडीगार्डने सेल्फी घ्यायला आलेल्या फॅनला दिला धक्का, व्हिडीओ पाहून भडकले लोक, म्हणाले..
साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या पाच वर्षात नॅशनल क्रश बनली आहे. तसेच तिने फिल्मी दुनियेत घवघवीत यश मिळवून. पुष्पा चित्रपटाना तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. पाच वर्षांआधी रश्मिका मंदाना हे नाव फार कुणाला ठाऊकही नव्हतं. आज अख्ख्या जगात रश्मिकाचे फॅन्स आहेत. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात. अलीकडेच, रश्मिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यापाहून लोक तिचे कौतुक करताना थकत नाहीत. पण तिच्या बॉडीगार्डवर यूजर्स भडकले आहेत.
रश्मिका मंदान्ना नुकतीच एका कार्यक्रमात स्पॉट झाली होती. यादरम्यान त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. तेवढ्यात एक चाहता तिच्या समोर आला आणि सोबत सेल्फी काढू लागला. यावर अभिनेत्रीच्या बॉडीगार्डने त्याला धक्का दिला, हे बघून अभिनेत्रीच हैराण झाली. या व्हिडिओमध्ये एक मुलगीही रश्मिकासोबत फोटो क्लिक करण्यासाठी आली होती, त्यामुळे अभिनेत्रीने तिला निराश न करता तिच्यासोबत एक फोटो क्लिक केला.
हा व्हिडीओ पाहून चाहते रश्मिकाचे कौतुक करतायेत. तर दुसरीकडे बॉडीचं वागणं पाहून भडकले आहेत. एका युजरने लिहिले आहे - हे सर्व करून, अभिनेत्यांसोबत सेल्फी घेऊन आयुष्यात काय बदल घडतो हे मला समजत नाही. एकजण म्हणाला - जेव्हा अभिनेत्रीला काही त्रास होत नाही, तेव्हा हे अंगरक्षक कसे आहेत जे तिच्यासाठी असे ढकलण्याचे काम करतात. असे काही यूजर्सनी चाहत्याला धक्काबुक्की करणाऱ्या बाऊन्सरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.