दीपिका पादुकोणला नव्हे तर या व्यक्तीला रणवीर सिंगने म्हटले आय लव्ह यू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:22 IST2019-07-31T17:18:11+5:302019-07-31T17:22:47+5:30

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टावर नुकताच एका मुलीचा फोटो पोस्ट केले असून त्यासोबत आय लव्ह यू असे लिहिले आहे.

Ranveer Singh wishes sister Ritika happy birthday with adorable photo | दीपिका पादुकोणला नव्हे तर या व्यक्तीला रणवीर सिंगने म्हटले आय लव्ह यू...

दीपिका पादुकोणला नव्हे तर या व्यक्तीला रणवीर सिंगने म्हटले आय लव्ह यू...

ठळक मुद्देया फोटोसोबत लिहिले आहे की, ही मुलगी अतिशय सुंदर असून दीदी, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... आय लव्ह यू... रणवीरने शेअर केलेला हा फोटो त्याची मोठी बहीण रितिकाचा बालपणीचा फोटो असून या फोटोत ती खूपच छान दिसत आहे.

रणवीर सिंगला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तो सोशल मीडियावर काय शेअर करतो याची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला त्याचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात. त्याने नुकताच एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला असून या फोटोतील व्यक्तीला त्याने आय लव्ह यू असे लिहिले आहे.

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टावर नुकताच एका लहान मुलीचा फोटो पोस्ट केला असून या फोटोसोबत लिहिले आहे की, ही मुलगी अतिशय सुंदर असून दीदी, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा... आय लव्ह यू... रणवीरने शेअर केलेला हा फोटो त्याची मोठी बहीण रितिकाचा बालपणीचा फोटो असून या फोटोत ती खूपच छान दिसत आहे. या फोटोत रितिकाने स्विमिंग कॉश्च्युम घातला असून तिच्या बाजूला एक टेप रेकॉर्डर आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर खूपच सुंदर हास्य दिसून येत आहे. 

रणवीर सिंगच्या ८३ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटातील रणवीरचा लूक काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. हा त्याचा लूक त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडला होता. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात काम करण्याविषयी तिने सांगितले होते की, '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय दुसरा कुणी अभिनेता साकारत असता तरी देखील मी या चित्रपटात काम केले असते. 

लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय. या चित्रपटाच्या टीममध्ये अनेक कलाकार असल्याने या चित्रपटाची टीम चित्रीकरणासोबत प्रचंड धमाल मस्ती करत आहे. 

Web Title: Ranveer Singh wishes sister Ritika happy birthday with adorable photo